शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 3 पिस्टल मॅगझीनसह, एक अतिरिक्त मॅगझीन व 6 जिवंत काडतुस मुद्देमालासह आरोपी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आह
दि. 12/01/2023 रोजी सपोनि श्री सुरेश शिरसाठ सो. यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली. की, सत्रासेन गावाकडुन भोईटी गावमार्गे शिरपुरकडे एका शेवरलेट कंपनीची क्रुझ मॉडेलची गाडी क्र. MII 15 CT 5688 हिच्यात काही इसम गावठी कट्टे घेवुन शिरपुर कडे जात आहे. यानंतर लगेच एक पथक तयार करून बातमीच्या मागावर
भोईटी गावाच्यापुढे जात असतांना नमुद वाहन समोरुन येतांना दिसली. सदर वाहनास पोलीसांनी हात देवुन वाहन थांबविण्याचा इशारा दिला परंतु सदर वाहनावरील चालकाने वाहन न थांबविता जोरात शिरपुर कडे निघुन गेला सदर कारचा पाठलाग करुन तिला भोईटी गावाजवळ अडवुन थांबविले असता, गाडीत बसलेल्या इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोसई/संदिप पाटील यांनी सदर इसमांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) मोहीत राम तेजवानी वय 21 वर्षे, रा. फ्लॅट नं. 10 A विंग गोदावरी कॉम्प्लेक्स चिंचवन रोड पंचवटी, नाशिक, 2) आकाश विलास जाधव, वय 24 वर्षे, रा. रुम नं. 15 देहमंदिर सोसायटी विसे चौक, गंगापुर रोड नाशिक, (3) राज प्रल्हाद मंदोरिया, वय 21 वर्षे, रा. प्लॉट नं. 6 आव्हाड निवास मधुबन कॉलनी पंचवटी नाशिक, 4) अजय जेठा बोरीस, वय 29 वर्षे, रा. रुम नं. 6 चैतन्य होसिंग सोसायटी रामवाडी पंचवटी, नाशिक, 5) श्रीनिवास सुरेंद्र कानडे, रा. 24 (ब) दिव्यदर्शन सोसायटी, विसेमळा कॉलेज रोड नाशिक, 6) दर्शन चमनलाल सिंधी, वय 21 वर्षे, रा. होळनांथे अजंदे बुद्रुक ता. शिरपुर जि.धुळे हे मिळुन आले त्याचे कडे चौकशी करुन गाडीची तपासणी केली असता गाडीच्या शिटच्या खाली लपवुन ठेवलेल्या 3 पिस्टल मॅगझीनसह, एक अतिरिक्त मॅगझीन व 6 जिवंत काडतुस मिळुन आले. सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळ मिळुन खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला.
1,75,000/- रुपये किंमतीचे तीन (3) गावठी कट्टे ( पिस्टल) त्यांची प्रत्येकी किंमत 25,000/- रुपये प्रमाणे किं.अं.
5000/- रुपये किंमतीची एक अतिरिक्त मॅगझीन
6000/-रुपये किंमतीचे एकुण 6 पिवळ्या धातुचे जिवंत काडतुस (राऊंड)
1,80,00/-रुपये किंमतीचे एकुण 7 मोबाईल
5,00,000/- रुपये किंमतीची एक शेवरलेट कंपनीची क्रुझ मॉडेलची चारचाकी गाडी तिचा आर.टी.ओ.क्र.MH 15 CT 5688
असा एकुण 7,66,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड सो, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे सो प्रभारी मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री आगरकर सो यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि / सुरेश शिरसाठ, पोसई / संदिप पाटील, पोना / संदिप ठाकरे, पोकों / संतोष पाटील, पोकों / संजय भोई, पोकों/ प्रकाश भिल, पोकों/ मुकेश पावरा, पोकों/ संतोष पाटील, चालक पोकों/ इसरार फारुकी यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याबाबत पोना / संदिप ठाकरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन गु.र.नं. 04/2023 आर्म अॅक्ट कलम मुं.पो.का. कलम 3/25 चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास पोसई/संदिप पाटील करत आहेत.
