शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेट व अभ्यास मंडळावर नियुक्त झालेल्या आर. सी. पटेल संकुलाच्या नवनिर्वाचित प्राचार्य व प्राध्यापक असे एकूण 13 जणांचा सत्कार करण्यात आला.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्वोच्च मंडळ सिनेट वर, प्राचार्य मतदार संघातून निवडून आले आहेत. तसेच आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय. एम. आर. डी. परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांची महिला प्राचार्य मतदार संघातून बिनविरोध निवड झाली. महाविद्यालयीन अध्यापक गटातून शिरपूर येथील श्रीमती एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. गजानन पाटील यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून विजय प्राप्त केला.
तसेच विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळांवर प्राध्यापकांची निवड झाली आहे. आर. सी. पटेल बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक बाविस्कर हे शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध, आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर हे फार्मास्युटिकल केमिस्ट्री अभ्यास मंडळावर बिनविरोध, आर. सी. पटेल आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अरुण एम. पाटील भौतिकशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध, आर. सी. पटेल आय. एम. आर. डी. चे प्रा. मनोज पटेल हे कॉम्प्युटर मॅनेजमेंट अभ्यास मंडळावर बिनविरोध, आर. सी. पटेल फार्मसी चे प्रा. डॉ. हितेंद्र महाजन फार्मास्युटिक्स अभ्यास मंडळावर बिनविरोध, आर. सी. पटेल फार्मसी चे प्रा. डॉ. मोहन कळसकर बी. टेक. कॉस्मेटिक अभ्यास मंडळावर बिनविरोध, आर. सी. पटेल आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रवींद्र पाटील मायक्रोबायोलॉजी अभ्यास मंडळावर बिनविरोध, एच. आर. पटेल महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. के. बी. पाटील संरक्षणशास्त्र अभ्यास मंडळावर बिनविरोध, एच. आर. पटेल फार्मसीचे प्रा. डॉ. पियुष बाफना फार्माकोलॉजी अभ्यास मंडळावर निवडून आले. तसेच आर. सी. पटेल बी. एड. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. एस. पुराणिक हे प्रशासन व मूल्यमापन अभ्यास मंडळावर बिनविरोध निवडून आले आहेत.
या सर्व प्राचार्य व प्राध्यापकांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार तथा शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते जनक विला निवासस्थानी 16 जानेवारी 2023 सोमवारी करण्यात आला. यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व सचिव प्रभाकरराव चव्हाण हे देखील उपस्थित होते.
