एच. आर. पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ





शिरपूर : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शिरपूर येथील एच. आर. पटेल कन्या कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे  उदघाटन कमळसरे येथील प्रथम नागरिक सरपंच श्रीमती सखुबाई भिल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच रवींद्र राजपूत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे पर्यवेक्षक जे. पी. पाटील, मच्छिंद्र भिल, अनिल माळी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आर. आर. रघुवंशी, महिला कार्यक्रम अधिकारी श्रीमती एस. जी. चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका एन. सी. पाटील, ए. एस. जाधव उपस्थित होते.
   
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख आर. आर. रघुवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजने च्या माध्यमातून नेतृत्वगुण, सेवाभाव विकसित होतात म्हणून सर्व रासेयो स्वयं सेवक यांनी सक्रिय सहभाग घेऊन श्रमदान, शाळाबाह्य मुले, विविध सर्वेक्षण, पथनाट्य यात सक्रिय सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. 11 वी कला शाखेच्या विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत व रासेयो गीत गायिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. यु. चौधरी यांनी तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी श्रीमती एस. जी. चौधरी यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने