शिरपूर - एस. व्ही. के. एम च्या निम्स कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांकडून शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात संसाधन व सामाजिक नकाश्याचे सादरीकरण करण्यात आले.
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या अंतर्गत कृषी महाविद्यालयातील चौथ्या वर्षातील विद्यार्थी दोन महिन्यांसाठी गावात राहत असून ते शेतकऱ्यांकडून व्यवहारीक ज्ञान मिळवतात आणि गावाची माहिती जाणून घेण्यासाठी विविध कार्यक्रम राबवतात. त्याच अनुषंगाने ग्रामीण लोकसहभागीय मूल्यवलोकना अंतर्गत गावाची परिस्थिती समजून घेण्यासाठी संसाधन व सामाजिक नकाशा तसेच वेन आकृतीचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी गावातील जेष्ठ नागरिक, शेतकरी व इतर ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमात सहभागी झाले. डॉ. के. व्ही. पाटील (सा. प्राध्यापक, कृषी महाविद्यालय व (समन्वयक) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी रोहीत निळे,साक्षी मोरे,आशितोष राजपूत,सागर पाटील,यश चव्हान्, रोहन महाजन,भुषण पाटील,प्रतिक् पाटील,प्रणव जाधव,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
