धरणात मिळाली मोटार ; अपघात कि घातपात पोलिसांकडून तपास प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे :  पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चासकमान धरण परिसरात साकुर्डी रस्त्याच्या लगत इको मोटार गाडी क्र एम एच 14 जे एक्स 8334 वाहनचालकाचा ताबा सुटल्याने गाडी धरण जलशयात गेली. गाडीत 3 व्यक्ती होत्या.  गाडी पाण्यात गेल्यानंतर काचा फोडून तीनही व्यक्ती एकमेकांचा आधार घेऊन पाण्यातून बाहेर निघाल्याचे स्थानिकांनी सांगितले.  त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा सगळा प्रकार अपघात कि घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  स्थानिकांकडून प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवारी रात्री तिघे जन धरणाजवळ असणाऱ्या हॉटेलवर पार्टी करण्यासाठी आले होते. रात्री उशिरा पार्टी करून जात असताना गाडीवरील ताबा सुटला व मोटार गाडी झाडाला आदळून गाडी पाण्यात गेली व हा अपघात घडला. सोमवारी सकाळी पाण्यात गाडी दिसल्याने व त्यात कुणीही नसल्याने या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला. त्यांनतर गाडी क्रेनच्या साहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आली.  परंतु मोटारीतील तरुण स्वतः मद्यधुंद अवस्थेत असताना व वाहन पाण्यात बुडालेले असताना वाहनाच्या काचा फोडून त्यांनी सुटका केलीच कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. डोंगर, पाणी व झाडाझुडपांच्या परिसरात दिवसा तुरळक वर्दळ असते, तर रात्रीच्या वेळी हा परिसर पुर्णतः निर्जन असतो. या संपूर्ण घटनेबाबत खेड पोलीस तपास करत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने