शिरपूर / स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारी, भारतातील पहिली शिक्षिका, समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 3 जानेवारी 2023 रोजी गायत्री हॉस्पिटल येथे सावित्रीची लेक समान सर्व जाती धर्मातील एका स्री जन्माचे भव्य स्वागत व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. वरवाडे शिरपूर येथील बापुजी युवा फाऊंडेशन यांच्या वतीने शासनाच्या बेटी बचाव बेटी पढाव या दृष्टीकोनातून मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे, मुलगी जन्माला आल्यानंतर तिचे स्वागत व जन्मदात्या आईचा सन्मान झाला पाहिजे,
मुलीच्या जन्मानंतर त्या घरात आनंदोत्सव साजरा केला पाहिजे,मुलगा मुलगी असा भेदभाव नसला तरच मुलगी जिवंत राहिल या विचाराने बापुजी युवा फाऊंडेशन गेल्या सहा वर्षांपासून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्री जन्माचे स्वागत करण्यात येत असते. यावेळी सावित्रीच्या लेकीस गुलाब पुष्प देवुन स्वागत तर साडीचोळी देवुन आईचा सन्मान करून मिठाई वाटप करण्यात आले.याप्रसंगी मा.नगरसेविका सुनंदाबाई शांतीलाल माळी, मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,डॉ.शेखर पाटील, डॉ.सौ.योगिता पाटील, शांतीलाल माळी,भालेराव माळी, संतोष माळी,संदिप देवरे, साहेबराव माळी,मंगेश माळी,सतिष माळी,संतोष खैरनार, जितेंद्र माळी, योगेश माळी गौरव सोनवणे, भिमराव पवार,प्रल्हाद पाटील, विनोद माळी, हॉस्पिटलचे कर्मचारी सह इतर मान्यवर उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन बापुजी युवा फाऊंडेशनच्या वतीने युवराज माळी, रविंद्र माळी,किशोर आण्णा माळी, विकास माळी व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.


