शैक्षणिक सहलीचे उत्स्फूर्त स्वागत....




दोंडाईचा - ज्ञानोपासक शिक्षण मंडळी संचलित
वाल्मीक ऋषी माध्यमिक विद्यालय तावखेडा प्र.न. तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे
येथील शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक सहलीचे( कोकण दर्शन) संस्थेचे मार्गदर्शक संचालक माननीय दादासाहेब अमितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका श्रीमती पी.पी. महिरे- वाघ यांच्या सुयोग्य नियोजनाने आयोजन करण्यात आले आहे.
 शैक्षणिक सहलीचे स्वागत संस्थेचे संचालक आदरणीय दादासाहेब अमितदादा पाटील व आदरणीय सुमित गरुड सर यांनी केले. प्रवासा दरम्यान विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. व कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी वेळेचे कोणतेही बंधन न ठेवता संपर्क साधावा अशी सूचना आदरणीय अमितदादा यांनी केली. व शैक्षणिक सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.
या शैक्षणिक सहलीत 56 विद्यार्थी व विद्यालयातील शिक्षक यांनी सहभाग घेतला आहे.
याप्रसंगी  दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय आण्णासाहेब विठ्ठलसिंगजी गिरासे, उपमुख्याध्यापक श्री एस एस पाटील, सहल प्रमुख श्री ए.के सावंत, श्री एन.पी. भिलाने ,श्री कुवर सी झेड ,श्रीमती मंगला डी कुवर, श्री पी.एच. लांडगे व समस्त पालक बंधू-भगिनी यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
सहलीच्या यशस्वीतेसाठी श्री जितेंद्र गिरासे, दिलीपआबा पाटील, चुडामननाना धनगर मेहनत घेत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने