दादासाहेब रावल फार्मसी कॉलेज, दोंडाईचा प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसी या पदविका आभासक्रमाचा आरंभ दोडाईचा अख्तर शाह




 दोडाईचा येथे श्री सी. एन. गिरासे   सेक्रटरी स्वोध्दारक विद्यार्थी संस्था, श्री आर. टी. गिरासे सर ( विकास अधिकारी स्वोध्दारक विद्यार्थी संस्था ) व प्राचार्य डॉ. घनश्याम चव्हाण सर, मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व पुज्यनीय दादासाहेब रावळ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात झाली,
या वेळी प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली ,
श्री. सी एन गिरासे यांचे मोलाचे मार्गदर्शन  उपस्थित सर्वाना  मिळाले. स्वोध्दारक या शब्दाचा अर्थ सांगताना विद्यार्थांनी स्वतःचा उद्धार करावा असा संगीताला व आर. टी. गिरासे सरणानी फार्मसी कॉलेज च्या मान्यते पासून ते कॉलेज सुरु करे पर्यन्त केलेल्या अथक परिश्रमाचे वर्णन केले. तसेच श्री आर. टी. गिरासे सर यांनी विद्यार्थी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस प्रेरणा दिली. प्राचार्य डॉ. घनश्याम चव्हाण सर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन कारतांना इंग्रजी बोलण्याचे महत्व सांगितले, तसेच उपस्थीत विद्यार्थी व पालक यांचे स्वागत पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले व शिक्षक व कर्मचारी यांचे देखील स्वागत मान्यवरांकडू करण्यात आले. प्रथम प्रवेश घेणाऱ्या विदयार्थी व विद्यार्थिनी यांना मान्यवरांकडून भेट वस्तू देण्यात आली. पुष्पक चौरे सर यांनी कार्यक्रमास आलेले मान्यवर शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग व विदयार्थी यांचे आभार प्रदर्शन केले. शिक्षक व
सुत्रसंचालन मनिष सिसोदिया यांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने