पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विविध अंतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यामधे बेसबॉल
,सॉफ्टबॉल ,कब्बडी ,खोखो ,चेस, क्रिकेट, अथलेक्टिक अशा विवध खेळांचा समावेश होता.त्यामधे इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामधील वेगवेगळ्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन यश मिळवले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये शिकत असलेल्या खेळाडू प्रदीप राखुंडे, खेळाडू सई भांगे आणि सुधीक्षा वावरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे होणाऱ्या अंतर्गत विभागीय बेसबॉल स्पर्धेकरिता निवड झाली.
तसेच सिविल विभागातील खेळाडू ओंकार बसाटे याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या अंतर्गत विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेकरिता निवड झाली.
त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागांमध्ये शिकत असलेल्या खेळाडू अंजली वाघमोडे हीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत कोपरगाव येथे होणाऱ्या अंतर्गत विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धा करिता निवड झाली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीचा अभ्यास करत महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रोफेसर साहिल बागवान सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने
शाहजीराव पाटील विकास प्रतिष्ठानचे
एस.बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय वनगळी, ता. इंदापूर यांच्या माध्यमातून
आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा ( मुले ) दिनांक १४,१५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एस.टी शिरकांडे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा प्रशिक्षक प्रा. साहिल बागवान यांचे अभिनंदन करून सत्कार केला.
या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन पाटील ,सचिव भाग्यश्री पाटील,उपाध्यक्षा सौ.अंकिता पाटील-ठाकरे आणि विश्वस्थ राजवर्धन पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
