द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्था तर्फे गरजू रुग्णांसाठी 115 प्रकारची मोफत औषधी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पीटलला भेट




शिरपूर : द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्था तर्फे गरजू रुग्णांसाठी 115 प्रकारची मोफत औषधी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पीटलला भेट स्वरुपात देण्यात आली.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते ही औषधी शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला सुपूर्द करण्यात आले.
द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्था शिरपूर यांचे वतीने गोरगरीब, वंचित रुग्णांसाठी विविध आजारांवर उपयोगी नामवंत कंपनीचे सुमारे 115 प्रकारची औषधी मोफत देण्यात आली. तसेच गरीब कुटुंबातील माता यांचेसाठी आवश्यक 500 आयर्न सुक्रोज इंजेक्शन देखील देण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष इंजिनिअर संजीव थोरात, सचिव ब्रिजेश थोरात, हॉस्पिटल व्यवस्थापक विष्णू गिरासे, गोपाळ जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने