अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बारामतीतच दादांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, भाजप आक्रमक प्रतिनिधी दत्ता पारेकर

 



पुणे:विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी छत्रपती संभाजी महाराज  यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी भाजपसह विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. अजित पवारांच्या सहयोग सोसायटीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.  संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक  होते, असं अजित पवार विधानसभेतील भाषणात म्हणाले होते. त्यावरुन भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


दरम्यान, बारामतीतच अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात  घेतलं. नागपूर अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता.


बारामतीतल्या भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला. यावेळी अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. अशा घोषणा देण्यात आल्या

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने