*जयश्रीबेन अमरीशभाई पटेल *सी.बी.एस. ई स्कूलमध्ये मकर संक्रांत उत्साहात साजरी



   

शिरपूर (प्रतिनिधी )-शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल  मध्ये दिनांक १६ जानेवारी , सोमवार रोजी मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला . भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला महत्त्व आहे. संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होत असते आणि हा निसर्गातील बदल विविध राज्यात संक्रांति च्या रुपाने साजरा केला जातो.
 शाळेत सुद्धा  पोंगल, लोहडी, उत्तरायण आणि मकर संक्रांति अशा विविध राज्यातील संक्रांतीच्या संकल्पना विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादर करून विविधतेतून एकता दाखवली.  कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या प्राचार्या आदरणीय मेघा मॅडम व शिक्षक पालक महिला सदस्य यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली.   पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थी शोभून दिसत होते . विविध राज्यातील वेशभूषेत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांनी दिल्या. यानंतर संक्रांतीच्या सणावर आधारित  विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. कार्यक्रमात उपस्थित महिलांना हळदीकुंकू  लावून तिळगुळ  व संक्रांतीचे वाण देण्यात आले . या कार्यक्रमात महिलांसाठी स्पर्धा घेण्यात आली  तसेच महिलांसाठी पतंग उडवणे हा उपक्रम घेण्यात आला . त्यात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखविला .   पूर्व प्राथमिकच्या  विद्यार्थ्यांसाठी  पतंगाच्या चित्रात रंगभरण करायचे होते विद्यार्थ्यांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला . प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी पतंग बनवणे हा उपक्रम होता . विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी सुंदर पतंग  बनवले. कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या आदरणीय मेघा मॅडम आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाल्या भारतीय संस्कृती ही नेहमी विविधतेतून  एकतेचा संदेश देत असते. तिळाचे महत्व प्राचीन काळापासून आपल्याला माहित आहे . निसर्गाशी  जुळवून घेणारे आपले हे सण आहेत . हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आपण जतन करून ठेवला पाहीजे .भारतीय संस्कृती विज्ञानाशी नाते जोडून आहे  असे विचार त्यांनी मांडले . या कार्यक्रमास पालकांचे उत्तम सहकार्य मिळाले . पालक आणि शिक्षण संस्था यातील स्नेहबंध मकर संक्रांतीच्या कार्यक्रमातून अजूनच घट्ट झाले.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका  शितल बाबर  यांनी  केले . तसेच आभार प्रदर्शन शिक्षिका आदिती बारी यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शिक्षिका सोनाली मामिडवार, अपर्णा मोकाशी ,सिमरन कौर, सुचिता जैन, नयन जांभळे,  दिपाली पाटील, चुन्नीलाल पावरा सर , प्रशांत पाटिल सर , सचिन सिसोदिया सर तसेच कार्यालयीन विभागाचे प्रमुख श्री . विशाल माळी सर  व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अशा  रीतीने जयश्रीबेन अमरीशभाई पटेल स्कूल मध्ये मकर संक्रांत उत्साहात  संपन्न झाली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने