शिरपूर : विश्व मानव रुहाणी केंद्र दहिवद तर्फे चिलारे या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर 8 जानेवारी 2023 रविवार रोजी घेण्यात येऊन शिबिरात एकूण 86 रुग्णांची तपासणी करण्यात आली. सदर रुग्णांना मोफत औषधी देण्यात आल्या.
या प्रसंगी सरपंच अमोल रवींद्र पावरा, उपसरपंच राजधर पावरा, पोलीस पाटील गुलाबसिंग पावरा, ग्रामसेवक श्री गिरासे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कामी डॉ. रवींद्र चौधरी (एम. डी. मेडिसिन), डॉ. भूपेंद्र राऊल व डॉ. शितल महाजन, फार्मासिस्ट सरिता जमादार यांनी आरोग्य निदान व औषध वितरण केले.
या प्रसंगी विश्व मानव रुहानी केंद्राचे सचिव यांनी 15 जानेवारी 2023 रोजी गोदी गावात आरोग्य शिबीर बाबत नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
Tags
news
