"3-आर प्रिंसिपल" चा वापर करुन शिरपूर वरवाडे नगर परिषद व बालाजी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला सेल्फी पॉईंट



शिरपूर : "3-आर प्रिंसिपल" चा वापर करुन शिरपूर वरवाडे नगर परिषद व बालाजी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला.

केंद्र शासनाच्या धर्तीवर देशभरात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे सुरु असून त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान राबविले जात असून शिरपूर वरवाडे नगर परिषद व बालाजी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे शिरपूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी "चलो मिलकर बढाये कदम स्वच्छता की ओर" असा स्वच्छता संदेश देणारे फलक देखील उभारण्यात आले. सदर कार्यक्रम माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, प्रशासक प्रमोद भामरे, माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमात तयार करण्यात आलेला सेल्फी पॉईंट हा जुन्या भंगार पत्रा व लोखंड वापरुन तयार करण्यात येऊन "3-आर प्रिंसिपल" चा वापर करुन निकषांची पूर्तता करण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी स्वच्छ भारत अभियानात आपला सहभाग महत्वाचा आहे असे सांगून सेल्फी पॉईंटचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल यांनी स्वच्छता विषयावर आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व महिला पुरूषांनी स्वच्छतेची शपथ घेतली व घोषणा दिल्या. नगरपरिषदेचे प्रशासकिय अधिकारी संजय हासवाणी यांनी स्वच्छ भारत अभियान हे महिलांच्या सहभागाने जनआंदोलन झाले पाहिजे असे सांगितले.

नोडल अधिकारी सागर कुलकर्णी यांनी स्वच्छ सर्वेक्षण निकषांची माहिती कार्यक्रम प्रसंगी दिली. नगर परिषदेच्या या उपक्रमात आपला मोलाचा सहभाग नोंदवून आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यास सहकार्य कसे होईल यासाठीच्या उपाय योजना आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके यांनी सांगितल्या.
यावेळी स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, प्रज्ञशील निकम, प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, बालाजी सेवा समितीचे दिव्या जैन, मिनाक्षी राठी, चारू पाटील, रिटा पटेल, शिल्पा अग्रवाल, संगिता देवरे, रेशा पटेल, सीमा रंधे, अलका पटेल, शोभा भंडारी, शारदा भंडारी, फरीदा जलगाववाला, नाजेराबी शेख, स्नेहल नेरकर, डिंपल गुजराथी, डॉ. राखी अग्रवाल, नेहा अग्रवाल, कल्पना राजपूत, कल्पना कोळी, शालिनी सोनवणे, ज्योती कटारिया, पूनम पाटील, पूनम अग्रवाल, मनीषा अग्रवाल, सुजाता गुजर, रंजना गुजर, अनेक महिला, नागरिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने