आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धा व बक्षिस वितरण



 
शिरपूर : आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील “राजगोपाल भंडारी हॉल” मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे शनिवार दि. 21 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजेपासून विद्यार्थ्यांसाठी “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत विविध स्पर्धा व सकाळी 10 वाजता बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांच्या पत्रानुसार “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाचे सर्वत्र आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रमाद्वारे 2018 पासून परीक्षेचा ताण दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे अनुभव आणि तणाव दूर करण्याचे मार्ग सांगून प्रोत्साहित केले जाते आणि हा एक अतिशय लोकप्रिय आणि उपयुक्त कार्यक्रम ठरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की "परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी घाबरू नये अशी माझी इच्छा आहे. मित्रांची कॉपी करायची गरज नाही, तुम्ही जे कराल ते आत्मविश्वासाने करा, मला खात्री आहे की तुम्ही सर्व परीक्षा उत्तीर्ण करू शकाल." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले “एक्झाम वॉरिअर्स” (Exam Warriors) हे पुस्तक, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी 28 मंत्र आणि पालकांसाठी 6 टिप्स आहेत. खूप लोकप्रिय असलेले हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
यावर्षी 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'परीक्षा पे चर्चा' सहाव्या आवृत्तीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सूचनेनुसार पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे.
कला आणि चित्रकला स्पर्धा. जानेवारी 2023 पूर्वी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षेवर चर्चा करण्याच्या कार्यक्रमात कला आणि चित्रकला यांचा समावेश करुन स्पर्धा आयोजित करण्यात येईल.
कार्यक्रमात विविध शाळांतील इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या 500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
“एक्झाम वॉरियर्स” या पुस्तकात कला आणि चित्रकलेचे विविध प्रकार दाखविण्यात आले असून स्पर्धेत विविध सर्जनशील पद्धतीने कला आणि चित्रकलेचा कार्यक्रम होईल. सहभागी विद्यार्थ्यांनी पुस्तकातील कोणत्याही मंत्राच्या चित्रांची त्यांच्या कलेतून रेखाटन, रंगसंगती करावी. हा कार्यक्रम अडीच तासांचा असून एक तास कला आणि चित्रकलेसाठी आणि पुढचा एक तास चित्रकलेच्या निवडीसाठी आणि उरलेला वेळ पुरस्कार वितरणासाठी असेल.
निवडक क्रमवारी एक, दोन आणि तीन जाहीर करताना प्रमाणपत्रासोबत स्मृतीचिन्ह देखील देण्यात येणार आहे. 10 सर्वोत्कृष्ट आणि 25 उत्कृष्ट कलांचे प्रमाणपत्र देखील सहभागींना देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. कार्यक्रम राजकीय नसल्याचे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस तथा मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांनी कळविले आहे.

आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या या स्पर्धेसाठी सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य, शिक्षक प्रयत्नशील आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने