देशाच्या अंतर्गत
सुरक्षत
पोलीस
दलाचा
महत्वाचा
वाटा
आहे.
चोरी,
खून,
दरोडे,
खंडणी
यासारख्या
पारंपारीक
गुन्हे
करणाऱ्या
आरोपींना
त्यांच्या
गुन्हे
करण्याच्या
पध्द्तीवरून
पकडणे
आव्हानात्मक
असते.
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दल
गुन्हेगारांवर
वचक
आणि
कायदा
सुव्यवस्था
सुरळीत
ठेवण्यात
यशस्वी
झालेआहेत.
हे
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दलाने
सन
2022
मध्ये
केलेल्या
वार्षिक
कामगिरीवरुन
स्पष्ट
होते.
नंदुरबार जिल्ह्यात
सन
2022
मध्ये
नंदुरबार
जिल्ह्यातील
विविध
पोलीस
ठाणे
अंतर्गत
एकुण
6084
गुन्हे
दाखल
झाले
होते
त्यापैकी
5578
गुन्हे
उघडकीस
आणण्यात
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दलाला
यश
आले
असून
दाखल
गुन्ह्यांपैकी
उघडकीस
गुन्ह्यांचे
प्रमाण
92
टक्के
आहे.
त्याचप्रमाणे
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दलाचे
गुन्हे
शाबितीचे
प्रमाण
देखील
38
टक्के
आहे.
सन 2022 मध्ये नंदुरबार
जिल्ह्यात
खूनाचे
एकुण
35
गुन्हे
35
गुन्हे
दाखल
झाले
होते
त्यापैकी
35
गुन्हे
उघडकीस
आणण्यात
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दलाला
यश
आले
असून
खूनाच्या
दाखल
गुन्ह्यांपैकी
उघडकीस
गुन्ह्यांचे
प्रमाण
100
टक्के
आहे.
त्याचप्रमाणे
खूनाचा
प्रयत्न
करण्याचे
35
गुन्हे
घडले
असून
सर्व
गुन्हे
उघडकीस
आले
आहेत.
मालमत्तेविरुध्द्चे
दरोड्याचे
09
गुन्हे
दाखल
असून
सर्व
गुन्हे
उघडकीस
आहेत.
तसेच
एकुण
मालमत्तेविरुध्द्चे
873
गुन्हे
दाखल
असून
246
गुन्हे
उघडकीस
आलेले
असून
43,54,521
रुपये
किमतीची
चोरीस
गेलेली
मालमत्ता
हस्तगत
करण्यात
आलेली
आहे.
त्याचप्रमाणे
दु:खापतीचे
268
गुन्ह्यांपैकी
268
गुन्हे
उघडकीस
आलेले
आहेत.
सन 2022 मध्ये बलात्कार,
विनयभंग
व
इतर
महिलांविरुध्द्चे
असे
एकुण
333
गुन्हे
दाखल
गुन्ह्यांपैकी
321
गुन्हे
उघडकीस
असून
त्याचे
प्रमाणे
97
टक्के
आहे.
महिलांविषयक
दाखल
झालेल्या
सर्व
गुन्ह्यांची
निर्गती
करण्यात
आलेली
आहे.
फसवणूकीच्या
40
दाखल
गुन्ह्यांपैकी
37
गुन्हे
उघडकीस
आलेले
आहेत.
अवैध दारु, जुगार,
गांजा
इत्यादी
अवैध
धंद्यांविरुध्द्
देखील
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दलाने
सन
2021
च्या
तुलनेत
भरीव
कामगिरी
केलेली
असून
सन
2021
मध्ये
अवैध
दारु,
जुगार
इत्यादी अवैध धंद्यांविरुध्द्
2328
गुन्हे
दाखल
करुन
3
कोटी
91
लाख
67
हजार
263
रुपये
किमतीची
दारु,
जुगार
व
इतर
साधने
जप्त
करण्यात
आलेली
आहेत.
सन
2022
मध्ये
2584
अवैध
धंदे
करणाऱ्यांविरुध्द्
गुन्हे
दाखल
करुन
5
कोटी
89
लाख
81
हजार
032
रुपये
किमतीची
दारु,
जुगार
व
इतर
साधने
जप्त
करण्यात
आलेले
आहेत. NDPS कायद्यांतर्गत
08
गुन्हे
दाखल
करुन
त्यांच्या
ताब्यातून
38
लाख
32
हजार
222
रुपये
किमतीचा
गांजा,
अफुची
बोंड,
चुरा
इत्यादी
जप्त
करण्यात
आला
आहे.
नंदुरबार जिल्हा
पोलीस
दलाने
कायदा
व
सुव्यवस्थेसाठी
बाधा
ठरणारे
तसेच
मालमत्तेविरुध्द्चे
गुन्हे
करणाऱ्या
01
गुन्हेगारी
टोळीतील
06
व्यक्तींना
नंदुरबार
जिल्ह्यातून
हद्दपार
केलेले
आहे.
तसेच
दाखल
गुन्ह्यातील
अटक
करण्यात
आलेल्या
5074
आरोपीतांविरुध्द्
प्रतिबंधक
कारवाई
करण्यात
आलेली
आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील
विविध
पोलीस
ठाणे
हद्दीत
दाखल
गुन्हे
उघड
करण्यावर
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दल
भर
देत
असून,
गुन्हेगारीला
आळा
बसावा
याकरीता
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दल
वेगवेगळ्या
उपायोजना
करीत
आहेत.
तसेच
नंदुरबार
जिल्हा
पोलीस
दलाकडून
गुन्हेगारीला
आळा
बसण्यासाठी
करण्यात
आलेल्या
विविध
उपाययोजनांचा
सकारात्मक
परिणाम
दिसून
येत
आहे
असे
नंदुरबार
जिल्ह्याचे
पोलीस
अधीक्षक
श्री.पी.आर.पाटील
यांनी
सांगितले.
%20(5).jpeg)