स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दोंडाईचा* *येथे आनंद मेळावा संपन्न*

 

दोंडाईचा (प्रतिनिधी) दि. ३१ डिसेंबर - येथील *स्वो.वि.संस्थेच्या दादासाहेब रावल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दोंडाईचा* या विद्यालयात आनंद मेळावा साजरा करण्यात आला.

   कार्यक्रमाचे उद्घाटन अराध्य दैवत गणपती व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन स्वोध्दारक विद्यार्थी संस्थेचे संचालक तथा सेक्रेटरी मा. भाऊसाहेब सी. एन. राजपूत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. डी.जी.गिरासे, प्रमुख अतिथी पालक श्री. सुरेश चौधरी, श्रीमती इंदिरा मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. ए. एन. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एफ. ठाकरे उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमात सकाळ व दुपार विभागातील सुमारे ११५ विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ, खेळ यात सहभाग घेतला. 

विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सकाळ - दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला. 

दरम्यान या कार्यक्रमात श्री. आर. डी. गुरव, एम. बी. बाविस्कर, अहेमद शेख सर, श्री. आर. डी. पाटील, श्री. पंकज महाजन, श्री. टी. व्ही. माळी या शिक्षकांसह अनेक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला. 

आनंद मेळावा कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. सरकार साहेबजी रावल, मा.मंत्री आ.श्री. जयकुमारभाऊ रावल, सामान्य प्रशासन सचिव मा.श्री. ललितसिंगजी भ. गिरासे, यांनी शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे संयोजन प्रमुख म्हणून श्री. व्ही. एन. निळे व श्री. एस. डी. गिरासे यांनी काम पाहिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्रकुमार बाविस्कर व श्री. आर. डी. गुरव यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहेमद शेख सर, श्री. आर. ए. चित्ते, श्री. पी. एस. गोसावी, श्री. युवराज मगाडे, श्री. वाय. जी. गिरासे, श्री. जी. के. राजपूत, श्री. राकेश माहेश्वरी, श्री. एच. वाय. बागल, श्री. कुलदीप रावल, श्री. ए. एस. परमार, श्री. एम. बी. गिरासे, श्री. एल. आर. खैरनार, श्री. एस. एन. जोशी श्री. डी. के. गिरासे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने