शिरपुर : - शहरातील हात गाडीवर किरकोळ व्यवसाय करणारे व्यवसाय यांना मेन रोडवर व्यवसाय करण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर या व्यवसायिकांच्या रोजगाराच्या प्रश्न निर्माण झाला असून कोणी जागा देता का जागा... अशी अंतर्गत हाक दिली जात असून व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी शिरपूर वरवाडे नगर परिषदेत निवेदन देण्यात आले आहे.
शिरपुर शहर पोलिसांकडून सुरू असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण धारकांवर कारवाईने रोजच्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणारे रस्त्यावरील हातगाडीधारक व्यावसायिक अडचणीत आले आहे. शिरपुर शहरात फिरते व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून 15 दिवसापासून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील फिरते व्यावसायिकांना प्रचंड अडचणीत आले आहेत. त्यामुळे नगरपालिकेने हातगाडी धारक फिरते व्यावसायिकांच्या समस्या सोडवून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करीत प्रशासकीय अधिकारी संजय हासवणी यांना निवेदन दिले.
सदरच्या कारवाईचे शिरपूरकर जनतेकडून जरी स्वागत करण्यात येत असले तरी अतिक्रमण निर्मूलन व त्यावर पर्यायी उपाय करणे या सर्व बाबी नगरपरिषद अंतर्गत येत असल्याने व नगरपरिषदेने यावर कोणतेही ठोस उपाय योजना केली नसल्याने अतिक्रमण वाढ झाली आहे. शहरातील सर्वच किरकोळ व्यवसायासाठी एक हॉकर्स झोन निर्माण करून व्यवसायिकांना व ग्राहकांना पर्यायी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना काहींकडून मांडली जात आहेत.
नगरपालिकेने व्यवसाय करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. यात शिरपूर नगरपरिषद निवडणूक तोंडावर असताना जर आमची पिळवणूक होत असेल तर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी देखील माहिती खाजगीत बोलताना काही व्यवसायिकांनी दिली आहे.
याप्रसंगी शहरातील 300 पेक्षा जास्त हातगाडी व्यवसाय यावेळी उपस्थित होते. यावर मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन बैठक लवकर मार्ग काढू अशी आश्वासन नगर परिषदेकडून दिले गेले आहे.
