दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिवस उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक श्री रमेश पारख, डॉ. स्वाती सोनवणे, सौ.योगिता कागणे,सौ.अनुराधाताई सोहोनी, रो.अनिश शाह, तर मान्यवर म्हणून संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, सौ.हेतल शाह, प्राचार्य एम. पी.पवार, श्रीमती बतुल बोहरी,पालक-शिक्षक संघाचे सदस्य व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी हेल्पिंग ऑफ मदर, स्पंज स्पर्धा. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी मुळाक्षरे,टॉवर स्पर्धा तर सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी,बटनिंग शर्ट,सुई-दोरा यासारख्या विविध स्पर्धांत सहभाग नोंदवला. चिमुकल्यांकडून सादर करण्यात आलेल्या कराटे प्रात्यक्षिक,बाॅल व म्युझिकल कवायतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पालकांनीही लंगडी,दिशा दाखवणे आणि जोडीने गाडी चालवणे या स्पर्धांत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्व विजयी विद्यार्थी व पालकांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डॉ.स्वाती सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी हा अनुकरणातून शिकत असल्याने पालकांनी दररोज वाचन करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला तर त्यांनाही वाचनाची सवय लागेल. असे मोलाचे मत मांडले.
योगिता कागणे यांनी बहुतेक लहानपणी गमतीदार खेळ खेळणाऱ्या मुलांना शालेय खेळात शिस्त लागते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका मोलाची असल्याचे मत मांडले.
प्रमुख पाहुणे रमेशजी पारख यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होण्यासाठी खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे.असा पालकांना संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयुरी भदाणे, दीपमाला ठाकूर , पूजा गिरासे,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले.
सूत्रसंचालन जया सोनवणे व कु. गायत्री राजपूत यांनी केले,तर बतुल बोहरी यांनी आभार मानले.
