नववर्षाच्या प्रारंभी 'माझा कट्टा' उपक्रमाद्वारे हितगुज !

 

(शिरपूर) 

येथिल आर. सी. पटेल आश्रमशाळा, शिरपूर येथे वर्षाच्या शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करणेसाठी सहशालेय उपक्रमांतर्गत 'माझा कट्टा' उपक्रमाच्या माध्यमाने प्राचार्य व मुख्याध्यापकांची प्रकट मुलाखत घेण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. 

या उपक्रमांतर्गत प्राचार्य श्री एच के कोळी व मुख्याध्यापक श्री बी बी सोनवणे यांची जेष्ठ शिक्षक श्री पी.डी. बच्छाव यांनी प्रकट मुलाखत घेतली. 

त्यासाठी एक विशेष कट्टा व चिठ्ठयांच्या माध्यमाने एक प्रश्नपेढी तयार करण्यात आलेली होती.

या प्रश्नांमध्ये जन्मापासूनचा तर आजपावेतोचा शैक्षणिक, सामाजिक प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. दोन्ही अतिथींनी आपल्या जीवनाची संघर्ष गाथा, आयुष्यातील कडू-गोड आठवणी  , नोकरीतील अनुभव इ. माहीती या मुलाखती दरम्यान विद्यार्थीना दिली. 

या मुलाखतीच्या माध्यमाने विद्यार्थी वर्गासमोर आयुष्य कसे असते, व्यक्तीचा प्रवास कसा असतो, आव्हाने  कशी पेलावित, आयुष्याचे खरे समाधान कशात आहे, वैयक्तिक आवडी-निवडी  इ. विविध पैलू उलगडलेत. दूरदर्शनवर घेतल्या जाणाऱ्या मुलाखतींसारखीच ही मुलाखत असल्याचा विद्यार्थी वर्गाला मूर्त अनुभव मिळाला. यानंतर शिक्षकांना चिठ्ठीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली. मुलाखतीं दरम्यान विद्यार्थी वर्गाने मनमुराद हास्याचा आनंद लुटला. 

सदर कार्यक्रमासं विद्यार्थी वर्गाने भरभरून प्रतिसाद दिला.

शेवटी शिक्षक वृंदांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमासं प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या शेवटी श्री एस पी भावसार यांनी आभार प्रदर्शन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने