धुळे तालुक्यातील मुकटी येथे सैन्य दलात निवड झालेल्या तरुणांची संपूर्ण गावात मिरवणूक रॅली काढून भव्य सत्कार करण्यात आला,सैनिक मित्र हेमंत (लालूभाऊ) पाटील यांच्या विशेष सहकार्याने व मुकटी गावातील तरुणांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
मुकटी येथील महेश प्रमोद पाटील,अंचाळे येथील हितेश सुपडू साळुंखे चिंचखेडे येथील नरेंद्र सुरेश मोरे व जयकुमार जगदीश देसले यांची नुकतीच सैन्य दलात निवड झाली असून त्यांची ही निवड गावासह परिसरात अभिमानास्पद बाब असून मुकटी येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी वैद्यकीय क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे डॉ.राहुल पाटील,डॉ.निलेश देसले डॉ.जितेंद्र खैरनार, सैनिक मित्र रविभाऊ माळी, चिंचखेडे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय सर मोरे, नंदकिशोर पाटील तसेच गावासह परिसरातील तरुण मित्रमंडळ व ज्येष्ठ नागरिक,माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमाला मुकटी गावातील समस्त युवक मित्रमंडळ,ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
