घर घर शास्त्रज्ञ- हर घर शास्त्रज्ञ" या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे राज्यस्तरावर नियोजन.

 

"घर घर शास्त्रज्ञ-हर घर शास्त्रज्ञ " या उपक्रमाच्या अनुषंगाने

रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी आँनलाईन गुगलमीट व्दारे सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेला मार्गदर्शक म्हणून

उपक्रमाचे प्रेरणास्थान असलेले सन्मा. डॉ. श्री ए ए नातू सर ( गव्हर्नर आयसर कोलकत्ता ) ,

सन्मा. डॉ. श्री रविंद्र रमतकर सर ( माजी संचालक, प्रादेशिक विद्याधिकरण राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर ) व सन्मा. डॉ. श्री. देवेंद्र तिवारी सर ( प्रिन्सिपल प्रोजेक्ट NIF गांधीनगर, गुजरात ) हे मान्य वर उपस्थित होते.

सभेचा मुख्य हेतु म्हणजे "घर घर शास्त्रज्ञ हर घर शास्त्रज्ञ " या उपक्रमातंर्गत महाराष्ट्र राज्यातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्रित करून स्थानिक लोकांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्या प्रत्यक्ष कृतीतून कशा सोडवायच्या असे मत आपल्या प्रास्ताविकातून मा. श्री.गजानन गोपेवाड यांनी मांडले तर कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना मा. डॉ श्री.रविंद्र रमतकर सर यांनी अपल्या अध्यक्षिय भाषणातून सखोल मार्गदर्शन केले व मा. डॉ श्री.ए.ए.नातू सर आणि  मा.डॉ श्री रविंद्र रमतकर सर यांची हा उपक्रम म्हणजे मध्यवर्ती संकल्पना असून याची संपूर्ण जबाबदारी अग्निपंख शैक्षणिक समुह महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक मा.गजानन गोपेवाड यांचे कडे देण्यात आली.

प्रास्ताविक मा गजानन गोपेवाड यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले 

मा. डॉ श्री देवेंद्र तिवारी सर यांनी या उपक्रमाच्या अनुषंगाने शिक्षकांना दिशादर्शक मार्गदर्शन केले.सोबतच आयसर पुणे येथील सोनल थोरवे यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले

मा.अर्चना वासेकर यांनी सूत्रसंचालन केले या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातुन उपक्रमशील शिक्षक उपस्थित होते  त्या पैकि राजकुमार तिरभाने,नारायण भिलाने,दत्तात्रय वाणी,सिध्दार्थ ठोंबरे,अर्चना गोल्हर, सौख्या साखरे,प्रलोभ कुलकर्णि ,पाटिल पी,ए  यांची निवड झाली असुन या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सिध्दार्थ ठोंबरे सरांनी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने