*सेवानिवृत्ती शिक्षक संजय पिंपळे यांचा सत्कार*

 

धुळे तालुक्यातील भिरडाणे येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक संजय श्रीधर पिंपळे यांनी आज तीस वर्षे सेवा देऊन आपला कार्यकाळ पूर्ण केला.विद्यार्थांना उत्कृष्ट शिक्षणाचे महत्त्व आपल्या जीवनात पटवून दिले. तसेच त्यांच्या कारकिर्दीत गावातील अनेक विद्यार्थी घडले.आज त्यांनी शिकवलेले विद्यार्थी नामांकित कंपनीत तसेच, उच्च पदावर कार्यरत आहेत, विद्यार्थी घडविण्यासह गावाच्या विकासात त्यांच्या मुलाचे सहकार्य होते.त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळ्याला ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील शिक्षक वृंद गावातील सरपंच व उपसरपंच ग्रामसेवक ,ग्रामपंचायत सदस्य , तसेच आजी-माजी विद्यार्थी ,मोठ्या संख्येने उपस्थित होते ,यावेळी भिरडाणे आणि गावातील पोलीस पाटील रामकृष्ण अहिरराव यांनी सेवानिवृत्त शिक्षक संजय पिंपळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने