धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक चा ब्रेक झाल्यामुळे ट्रक घाटात रस्त्यावर पलटी झाल्याने मोठा अपघात नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात मंदिराजवळ ट्रक चा ब्रेक झाल्यामुळे अनियंत्रित मकई च्या गोण्यानी भरलेला ट्रक घाटात रस्त्यावर पलटी झाल्याने मोठा अपघात होऊन महामार्गवर ५-६  तास वाहतूक ठप्प झाली होती.


याबाबत सविस्तर माहिती अशी की. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अमरावती हून गुजरातच्या दिशेने जाणारी ट्रक क्रमांक जी जे १२ बी टी २०५५ या अवजड वाहनाचा अचानक ब्रेक फेल झाल्याने कोंडाईबारी घाटात मंदिराजवळ वळणावर डोंगराच्या बाजुस धडक दिल्याने पलटी झाल्याने अपघात झाला यात ट्रक चालक यास किरकोळ जखमी झाला असून ट्रक मधील मकईचे दाणे भरलेल्या असंख्य गोण्या रस्त्यावर पसरली होती तर महामार्गावरील या घाटात मंदिराजवळ दुसर्‍या मार्गावर पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे विसरवाडीच्या दिशेने जाणारा हा एकमेव एकेरी हाच एक मार्ग असल्याने  वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग वाहतूक मदत केंद्रचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल शेजवळ यांच्यासह पोलिस अमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या मधोमध पडलेला ट्रक व मकईच्या गोण्या या बाजूला करून महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली या दरम्यान चार ते पाच तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे महामार्गावरील प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटी बस, कार, अवजड वाहने यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यांना वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला अनेक प्रवाशांचे महत्त्वाचे काम असल्यामुळे त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू न शकत असल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून परतावे लागले. 

याच ठिकाणी 100 मीटर अंतरावर आदल्या दिवशी एक दिवस अगोदर ब्रेक फेल ट्रॉला व दोन कार अपघात झाला होता त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्यांदा अपघात झाल्याने महामार्गावर अपघाताची मालिका सुरू झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने