शिरपूर येथिल आर सी पटेल माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता १० वी चा विद्यार्थी भरत भुवानसिंग पावरा याने नुकत्याच संपन्न झालेल्या विभागिय क्रीडा स्पर्धेत 100 मीटर रनिंग या प्रकारात नाशिक विभागात द्वितिय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे. भरत भुवानसिंग पावरा याची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. सदरहू खेळाडू विद्यार्थीसं क्रीडाशिक्षक श्री एस आर खैरनार व प्राचार्य एच के कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
भरत पावरा याच्या यशाबद्दल आ. श्री अमरिशभाई पटेल, प्रकल्प अधिकारी मा. तृप्ती धोडमिसे , उपनगराध्यक्ष श्री भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री राजगोपालजी भंडारी, सचिव श्री प्रभाकरराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ उमेश शर्मा, सहायक प्रकल्प अधिकारी श्री ठाकरे , शिक्षण विस्तार अधिकारी श्री एम के सनेर , प्राचार्य श्री एच के कोळी, मुख्याध्यापक श्री बी बी सोनवणे यांनी अभिनंदन केले असून राज्यस्तरावर यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
