आर सी पटेल प्राथमिक विभागातर्फे भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन



शिरपूर दि.१६(प्रतिनिधी)-येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर सी पटेल ट्रस्ट यांच्यावतीने स्व हेमंतबेन रसिकलाल पटेल मम्मजींच्या जयंती निमित्ताने भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१९ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वा दिपप्रज्वलनाने सुरु होणारे या भव्य क्रीडा महोत्सवाला संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल कार्याध्यक्ष श्री भुपेशभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी संचालक श्री चिंतन भाई पटेल माजी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल संचालिका सौ कृतीबेन पटेल संस्थेचे सीईओ डॉ उमेशजी शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 *रांगोळी स्पर्धा* -यावेळी दि.१८ डिसेंबर रोजी आर सी पटेल प्राथमिक विभागातर्फे सर्व शिक्षक शिक्षिकांसाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून प्रथम तीन क्रमांकाना बक्षीस देण्यात येणार आहे.
 *झाॅंकी*-दि.१९ डिसेंबर रोजी विविधतेतून एकता या विषयावर सकाळी ९.३० वा आर सी पटेल मेन बिल्डिंगचा प्रांगणात संस्थेचे २०-२५ प्राथमिक शाळा सुंदर झाॅंकी काढणार असून सर्व शाळांमध्ये दिलेल्या विषयांवर वेशभूषा सादरीकरणसह जोरदार पूर्वतयारी सुरु आहे.
या भव्य क्रीडा महोत्सवात विविध वयोगटातल्या इ.१ली ते ४ थीसाठी १०० मी धावणे,५० मी लंगडी,खो-खो, कबड्डी कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन रस्सीखेच दोरी उडी यासारखे अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या भव्य क्रीडा महोत्सवाचा यशस्वीतेसाठी *विविध समित्या* प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांना प्रमुख करण्यात आले आहे यासाठी-बक्षीस समिती-श्री इफ्तेखार सर श्री प्रशांत लोहार सर,निकाल समिती-श्री बी बी सोनवणे सर  श्री गणेश साळुंखे सर,प्रसिद्धी समिती-श्री पी एस गहीवरे सर  श्री आर बी खोंडे सर,चहा व नाश्ता-श्री गिरीश पाटील सर श्री रितेश कुलकर्णीसर अशा विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने