शहादा पो.स्टे.हद्दीत असलोद दूरक्षेत्र अंतर्गत जाम गाव जावदा जवळ तालुका शहादा येथे काल दि.30/11/22 रोजी 14.30 वा सुमारास लालसिंग शिवराम चव्हाण वय अंदाजे 35 वर्ष रा. देवधरा तालुका पानसोमल जिल्हा बडवानी (मध्य प्रदेश) हे पाण्यात बुडाले होते .
याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर शहादा पोलीस स्टेशनचे पी एस आय राजन मोरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देत मदत करायला सुरुवात केली.त्यांचा मृतदेह सीताराम पंजू भोई रा.प्रकाशा यांना बोलावून त्यांचे सोबत स्वतः पाण्यात उतरून मृतदेह 15.ते 20 पाण्यातून त्यांचाफूट पाण्यातून बाहेर काढला आहे. मोरे यांच्या जन्मदिवस असताना तो साजरा करणे ऐवजी त्यांनी प्रथम आपले कर्तव्य पार पाडले.ताबे अंमलदार मार्फत मृतदेह म्हसावद ग्रामीण रुग्णालय येथे पाठवलेला असून नातेवाईक यांना सूचित करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलीस अधिकारी यांच्या जन्मदिवस असताना देखील त्यांनी बजावलेल्या कर्तव्याबाबत त्यांचे विशेष कौतुक होत असून मृतांच्या नातेवाईकांकडून आभार व्यक्त होत आहेत.
