विरोधकांच्या राजकीय टिकेला उत्तर न देता लोकोपयोगी कामांतून ठोस प्रत्योत्तर देऊ -- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे





पत्रकार रणवीरसिंह राजपूत,ठाणे

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवसेना-बीजेपी युतीचे राज्य हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याने, 
त्यांचे मूलभूत प्रश्न सोडविताना विरोधकांच्या राजकीय टिकेला उत्तर न देता,जनकल्याणाची कामे करून त्यांना ठोस प्रत्योत्तर देऊ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना केले.
हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांनी संकटसमयी लोकांच्या मदतीला धावून जाण्याची शिवसैनिकांना शिकवण दिली,तिचे तंतोतंत पालन करून,कोरोना महामारी असो वा कुठलीही नैसर्गिक आपत्ती...युती सरकारने नेहमी पूर्णक्षमतेने मैदानात उतरून संकटग्रस्तांना वेळीच मदतीचा हात देत,त्यांना सुखद दिलासा दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात नेहमी रक्ताचा तुटवडा भासत असल्याने गरजू रुग्णांचे जीव धोक्यात जातात,या पार्श्वभूमीवर *३१ डिसेंबर* हा दिवस साजरा करताना धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी *रक्तदान* करण्याचा लोकोपयोगी पायंडा पाडला.त्याला अनुसरून ठाणे येथे रक्तदान शिबिर भरवून केवळ एका दिवसात ११००० बाटल्या रक्तदान करण्याचा विक्रम मागील वर्षी ठाणेकरांनी केला,याचा मला सार्थ अभिमान आहे,असे गौरवोद्गार शिंदेसाहेबांनी याप्रसंगी काढले.
कोरोना महामारीच्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यालय २४ तास चालू ठेऊन गरजू रुग्णांना अन् त्यांच्या कुटुंबियांना रुग्णसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत सर्वतोपरी मदत करून,गोरगरीब,मध्यमवर्गियांचे प्राण वाचविलेत.यासाठी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अन् त्यांच्या कृतिशील टीमचे मनस्वी अभिनंदन करून,त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

*रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा* हे ब्रीद मनाशी बांधून,केवळ एका फोनवरून गरजू रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या कक्ष प्रमुख मंगेश चिवटे अन् त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत असणाऱ्या धाडसी टीमचे रुग्णसेवेचं पवित्र कार्य हे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच संस्थांना निश्चित पथदर्शक ठरेल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असल्याने,येथील कुठलाही आर्थिकदृष्या दुर्बल घटक आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही,यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी हातात हात घालून तनमनधनाने रुग्णसेवा करण्यास तत्पर रहावे,असे आवाहन शिंदेसाहेबांनी यावेळी केले.

ठाणे कोपरी येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात सुरू केलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रुग्णसेवेचं लोण अवघ्या पाच वर्षात २७ जिल्ह्यात पोहोचून,त्यात आज ५ हजार रुग्णसेवक स्वयंस्फूर्तीने कार्यरत आहेत,याचा मला मनस्वी आनंद होताहे अन् हीच खरी तुमच्या आमच्या सर्वांच्या परिश्रमाची फलश्रुती आहे,अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी येथे केली.
शिंदेसाहेबांच्या प्रेमापोटी *न भूतो न भविष्यति* अशी राज्यभरातील रुग्णसेवकांची भाऊगर्दी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जमली होती. 
*अनाथांचे नाथ एकनाथआगे बढो*,
हम तुम्हारे साथ हैं*,अशा गगनभेदी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता.हीच खरी तन्मयतेने *राजकारणातून समाजकारण* केल्याची पावती आहे. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने