भारत बंद व तीर्थ रक्षासाठी दोंडाईचा जैन समाजा तर्फे भव्य मोर्चा अप्पर तहसीलदाराना निवेदन दोडाईचा (अख्तर शाह)

 

दोडाईचा *जैन तीर्थ श्री सम्मेद शिखरजी ला पर्यटन स्थळ घोषित केल्याच्या निषेधार्थ*

१२ डिसेंबर बुधवार रोजी जैन तीर्थ क्षेत्र श्री सम्मेद शिखरजी ला पर्यटन क्षेत्र घोषित केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारत वर्षांत जैन समाजा तर्फे बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. त्यातच दोंडाईचा सकल जैन समाजाने झारखंड सरकार च्या निषेधार्थ मोर्चा काढत मा. तहसीलदाराना  निवेदन देउन जैन व्यापारी बांधवां तर्फे आपली आस्थापने दिवस भर बंद ठेवण्यात आली.

झारखंड राज्य सरकारच्या वन्य व पर्यटन धोरणामुळे जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थ क्षेत्र श्री सम्मेद शिखरजी चे पावित्र्य खंडित होत आहे. त्याच प्रमाणे गुजरात येथील पवित्र शत्रुंजय तीर्थ व गिरनार तीर्थ वर मागील काही दिवसांपूर्वी असामाजिक तत्वांचे उपद्रव वाढले आहेत. मंदिरात तोड़फोड़ करणे, भाविकांना त्रास देणे असे अनेक प्रकार घडत आहेत. यावर झारखंड आणि गुजरात च्या राज्य सरकार तसेच केंद्र सरकार चे लक्ष्य वेधण्यासाठी तसेच जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा यासाठी भारत बंद व तीर्थ रक्षासाठी भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले. सदर मोर्चा जैन दादावाड़ी येथुन राजपथ मार्गे मुख्य बाजारपेठ मधून तहसीलदार कार्यालय पर्यंत मोर्चा   काढण्यात आला.


 मोर्चात जैन समाजातील महिला व पुरुष मोठ्या  संख्येने  लोकांनी सहभाग नोंदवला.  दोंडाईचा पोलिस स्टेशनचे पो नि श्री दुर्गेश तिवारी यानी चोख बंदोबस्त ठेवण्यात  आले  

यावेळी रमेशचन्द कर्नावट अध्यक्ष सकल संघ, संजय कांकरिया कार्यकारी अध्यक्ष स्थानकवासी संघ, धरमचंद बोथरा अध्यक्ष मूर्तिपूजक जैन संघ, डुंगरचंद बाफना अध्यक्ष दादावाड़ी ट्रस्ट, प्रदीप मुणोत अध्यक्ष तेरापंथ सभा, सुभाष बडजात्या अध्यक्ष दिगंबर जैन संघ, भारतीय जैन संघठन अध्यक्ष धनराज श्रीश्रीमाळ, जैन सोशल गृप अध्यक्ष महेंद्र चोपड़ा, जैन सोशल युवा गृप अध्यक्ष शुभम कांकरिया, जैन ड्युड्स फ्रेंड सर्कल अध्यक्ष शैलेश बोथरा, व्यापारी असोशिएशन सचिव विरेन्द्र रूणवाल, किराणा असोशिएशन संचालक जितेंद्र सोलंकी, अग्रवाल समाज प्रतिनिधि भरत अग्रवाल, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे डॉक्टर दुग्गड, रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्स तर्फे राजेश मुणोत, भाजपा शहराध्यक्ष प्रविण महाजन आदि उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविन्द्र टाटीया, रविन्द्र कोठड़िया, मनोज पारख, अशोक कुचेरिया,दिनेश कर्नावट, मयूर पारख, शैलेश बोथरा, जितेंद्र कोचर,रितेश सोलंकी, चिंतन कोचर, चेतन सोलंकी, निलेश बाफना, निलेश बोथरा, निखिल कर्नावट, अमित नवाल सह समाजातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने