राज्य उत्पादन शुल्क साक्री विभागाची नाताळ व नववर्षच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई

 



साक्री - राज्य उत्पादन शुल्क साक्री विभागाची नाताळ व नववर्षच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई केली असून वाहन व जप्त मुद्देमाल असा एकूण रु.१३,५४,०००/- अंदाजे किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 या विभागाचे मा. आयुक्त डॉ. श्री. विजय सूर्यवंशी साहेब. (भा.प्र.से) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई मा. श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई मा. श्री. अर्जुन ओहोळ साहेब विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभाग, नाशिक, मा. श्री. मनोज शेवरे साहेब अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री. बी. एस. चोथवे राज्य उत्पादन शुल्क, साक्री विभाग धुळे यांनी दिनांक २६/१२/२०२२ रात्रीची गस्त दरम्यान वार्सा मोहगाव रोड, मांजरी फाटा. मांजरी, ता. साक्री जि. धुळे या ठिकाणी संशयित वाहनाची तपासणी सुरु असतांना वाहन क्र एम एच ०३८४०३४ मारुती सुझुकी या कंपनीची बँगनर चार चाकी वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनाच्या चोर कप्पा मध्ये अवैध देशी दारू मिळून आली. तसेच वाहनचालकाची कसून चौकशी केली असता परराज्यातील विदेशी मद्य रॉयल ब्लू व्हिस्की १८० मिली क्षमतेच्या एकूण ८१६० पेट बॉटल (१७० बॉक्स) मिळून आले. सदर वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव विनायक सुकन्या आकल (मावची) रा शेवड . .ता.साक्री, जि. धुळे असे सांगितले. त्यास जागीच अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्या प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर वाहन व जप्त मुद्देमाल असा एकूण रु.१३,५४,०००/- अंदाजे किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेवून गुन्हा क्र ७५/२०२२ दिनांक २६/ १२ / २०२२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.


सदरची कारवाई श्री. बी. एस. चोथवे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क साक्री विभाग, धुळे श्री . एस. एस. हांडे निरीक्षक शिरपूर श्री. डी. एल. दिंडकर, निरीक्षक भरारी पथक धुळे दुय्यम निरीक्षक श्री. शिंदे, मानकर, स.दु.नि श्री. निकुंबे तसेच जवान श्री. गोरख पाटील देवरे, गोसावी, वाहन चालक श्री. निलेश मोरे राज्य उत्पादन शुल्क विभाग, धुळे यांचे पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास श्री. बी. एस. चोथवे, दुय्यम निरीक्षक, साक्री विभाग, जि.धुळे, हे करीत आहेत.


तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवैधमद्य निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार आल्यास या विभागाचा टोल फ्री क्र. 180023399999 व WHATSAAP नं 8422001133 तसेच दूरध्वनी क्र. 02562297484 या क्रमांकावर संपर्क साधावा.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने