धुळे- खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र आयोजित 6 वे अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे यांची निवड करण्यात आली तर स्वागताध्यक्षपदी सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान आहिराणी साहित्य संमेलन 21 व 22 जानेवारी रोजी होणार्या साहित्य संमेलनात आहिराणी साहित्यिकांची मांदियाळी जमणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, यंदा धुळ्यात दोन दिवसीय अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलन होत आहे. दि.21 जानेवारी व 22 जानेवारी रोजी हे संमेलन धुळ्यातील हिरे भवन येथे पार पडणार आहे. त्याअनुषंगाने आहिराणी सहित्य संमेलनाच्या धुळे येथील संपर्क कार्यालयात आज दि.26 डिसेंबर रोजी बैठक पार पडली. बैठकीत खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी यांनी माहिती देतांना सांगितले कि, आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे हे सेवा निवृत्त हे निवृत्त माध्यमिक शिक्षक असून स्तंभ लेखनाच्या माध्यमातून साहित्य लेखनाला सुरुवात केली, काव्य,कथा,ललित अशा विविध साहित्य प्रकारातून त्यांनी अविरातपणे लिखाण केले आहे. आहिरणी साहित्याला वाहिलेले पहिले आहिराणी खानदेशनी वानगी हे त्रैमासिकही ते नियमितपणे चालवित असतात.आहिराणी भाषेचा प्रचार,प्रसार आणि जोपासनेसाठी त्यांनी स्वताला वाहून घेतले आहे. एकूण कारकिर्दीचा विचार करुन रमशे बोरसे यांचा आहिराणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे. धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. खान्देश आणि आहिराणी भाषेला न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री रोहिदास पाटील,आ.कुणाल पाटील यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. नाशिक आणि धुळे येथे झालेल्या आहिराणी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनात आ.कुणाल पाटील यांचा मोलाचा सहभाग होता. दरम्यान आहिराणी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महिलेला संधी दिल्याने आयोजकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. आ.कुणाल पाटील यांच्यासोबत सौ.अश्विनीताई पाटील यांचे राजकारण आणि समाजकारणात सक्रीय सहभाग असतो. बचत गट, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, अशा क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. सौ.अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या स्वागताध्यक्षपदी नियुक्तीचे स्वागत केले जात आहे. आहिराणी साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला प्राचार्या रत्नाताई पाटील, शाहिर श्रावण वाणी, नुतन अध्यक्ष रमेश बोरसे, प्रा.रमेश राठोड,रंजन खरोटे, प्रा.डॉ.सदाशिव सुर्यवंशी,प्रभाकर सुर्यवंशी, विश्राम बिरारी, रविंद्र पानपाटील, चुडामण पाटील,प्रविण पवार,आकाश महाले,अॅड.कविता पवार, नाजनीन शेख,कमलेश शिंदे,डॉ.रमेश जैन,एस.जे.बोरसे,श्रीकृष्ण बेडसे,के.एन.साळुंखे, अशोक महाले,अॅड.सागर तापकिरे प्रा.अशोक शिंदे आदी साहित्यिक उपस्थित होते.
