इंदापूर तालुक्यात 7 गावांच्या पाणीपुरवठा योजनांना शिवसेना-भाजप सरकारकडून मंजुरी -अँड. जामदार - हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्न प्रतिनिधी दत्ता पारेकर




         पुणे:   इंदापूर तालुक्यातील 7 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे माध्यमातून व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्नामुळे  शिवसेना -भाजप युती सरकारकडून चालु नोव्हेंबर/डिसेंबर 2022 मध्ये मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी रविवारी दि. 4 दिली.
             राज्यातील सत्तारूढ झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना-भाजपने सरकारने इंदापूर तालुक्याची जनतेला दिलेली भेट आहे. योजनेस मंजुरी मिळालेली गावे पुढीलप्रमाणे:- वडापुरी - (रु.13.55 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22).,  वालचंदनगर - (रु.46.45 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22).,  सणसर - (रु.54.54 कोटी, मंजुरी दि.1/12/ 22)., उद्धट- प्रादेशिक पाणीपुरवठा योजना - (रु.102.65 कोटी, मंजुरी दि.1/12/ 22).,  शेळगाव - (रु.49.30 कोटी, मंजुरी दि.1/12/ 22).,  भरणेवाडी - (रु.16.32 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22)., कळस- (रु.27.97 कोटी, मंजुरी दि.21/11/ 22)
       पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारकडून देशात हर घर हर जल ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. सदर कार्यक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील या 7 गावांच्या योजनांना शिवसेना-भाजप सरकारने मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी आभार व्यक्त केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने