शिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ तर्फे 16 डिसेंबर 2022 शुक्रवार पासून दहा दिवसीय “युवा स्पोर्टिफेस्ट 2022” चा शानदार उद्घाटन सोहळयाने शुभारंभ झाला असून 12 व 14 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी 12 विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत.
एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवा कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्रीडा स्पर्धांचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले असून यावर्षी फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉलीबॉल, रेसलिंग, स्विमिंग, बॉक्सिंग, कबड्डी, कॅरम, टेबल टेनिस, लॉन टेनिस, ॲथलेटिक्स या 12 क्रीडा स्पर्धा शिरपूर व धुळे येथे एस. व्ही. के. एम. संस्थेतील विविध शाळांमध्ये घेण्यात येत आहेत.
गोपाल भंडारी गोपाल भंडारी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ “युवा स्पोर्टीफेस्ट 2022” चे उद्घाटन व सरस्वती पूजन, स्व. मुकेशभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता शिरपूर शहरातील अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या भव्य मैदानावर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा तसेच आंतरराष्ट्रीय स्विमींगपटू तथा शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त रोहित राजेंद्र हवलदार, आंतरराष्ट्रीय ओपन स्विमींगपटू तथा टेनझिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंन्चर पुरस्कार प्राप्त शुभम धनंजय वनमाळी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष धनंजय वनमाळी, प्रो-कबड्डी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र राजपूत, एस.व्ही.के.एम. सेंट्रल स्पोर्टस् कमिटी चेअरमन नविन शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक बबनलाल अग्रवाल, श्री बालाजी संस्थान उपाध्यक्ष गोपाल भंडारी, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, जाकीर शेख, एस. व्ही. के. एम. स्पोर्ट डायरेक्टर किरण आंचन, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्य डॉ. पी. सुभाष, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राचार्य सुनंदा मेनन, अमोल परब, सचिन पाटील, अनिता थॉमस, स्मिता पंचभाई, रेखा सूर्यवंशी, भूमिका गर्ग, मधुबाला राही, मनीषा अँड्रेस, मेघा मुंगसे, स्पोर्ट असिस्टंट डायरेक्टर अभय कचरे, सपना मराठे, विकास पंजाबी, प्रा. विनय पवार, प्रा. राहुल स्वर्गे, संदीप देशमुख, विविध शाखांचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, अनेक जिल्ह्यातील 45 शाळांचे खेळाडू, त्यांचे शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रास्ताविक प्राचार्य निश्चल नायर यांनी केले. सर्व प्रमुख पाहुण्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी 45 शाळांमधील खेळाडूनी मानवंदना देत संचलन केले. अमरिशभाई आर पटेल सीबीएसई स्कूल, मुकेश आर. पटेल सीबीएसई व मुकेश पटेल मिलिटरी स्कूल तसेच धुळे येथील एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य व सुंदर गीत गायन केले. सूत्रसंचालन राकेश साळुंखे व संगीता शर्मा यांनी केले.
या स्पोर्ट्स कार्निव्हलसाठी 45 शाळेतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले असून स्पोर्ट्स कार्निव्हल मार्फत खेळाडूंना सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. त्यांना या स्पर्धांमधून लक्ष केंद्रित करण्याची, खूप काही शिकण्याची आणि दृढ निश्चय व खिलाडूवृत्ती विकसित करण्याची संधी प्राप्त झाली आहे. यात अनेक ट्रॉफी, पदके आणि प्रमाणपत्रे देवून खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रे, पदकांच्या स्वरूपात पुरस्कार दिले जातील. शिरपूर-चोपडा रोड, प्रियदर्शिनी सूतगिरणी समोर मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूल, तांडे ता. शिरपूर व मुकेशभाई आर. पटेल मुला-मुलींची मिलिटरी स्कूल आणि ज्यु. कॉलेज तांडे. ता. शिरपूर, अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या मैदानावर 16 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत विविध स्पर्धा संपन्न होतील. धुळे येथे एस. व्ही. के. एम. सीबीएसई स्कूल येथे टेबल टेनिस स्पर्धा घेण्यात येतील.