नवापूर येथील लॉकअप तोडून पळालेल्या 03 गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या, पलायन केलेले सर्व आरोपी पुन्हा जेरबंद.. नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे

 

नवापूर - 


दिनांक 05/12/20022 रोजी रात्रौ 01/15 वा. सुमारास नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील MIDC कडे जाणारे रस्त्यावर 1) हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण वय- 20 वर्ष रा- कुंजखेडा ता- कन्नड जि. औरंगाबाद 2) इरफान इब्राहिम पठाण वय- 353) युसुफ असिफ पठाण वय- 224) गौसखों हानिफखॉ पठाण वय 34 क्र. 2 ते 4 रा- ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद 5) अकिलखॉ ईस्माईलखाँ पठाण वय- 22 रा- कठोरा बाजार ता- भोकरदन जि. जालना हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कार्पिओ मोटार गाड़ी MH 13 N 7626 वाहनासह मिळून आले म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द् नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 640/2022 भादंवि क 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी 06.45 वा. अटक करण्यात आली होती.


तसेच अटक करण्यात आलेले आरोपी सराईत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहाता आरोपी नामे हैदर पठाण व युसुफ पठाण यांचेवर मध्य प्रदेश राज्यातील रतलाम पोलीस ठाणे येथे प्रत्येकी 01, इरफान पठाण याचेवर कन्नड जि. औरंगाबाद पोलीस ठाणे येथे 01 व गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार व आरोपी नामे गोरखा पठाण याचेवर औरंगाबद जिल्ह्यातील अजिठां, कनड, सिल्लोड इत्यादी ठिकाणी 08, मध्य प्रदेश राज्यातील रतलाम येथे 02 मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


परंतु दिनांक 05/12/2022 रोजी 09.05 वा. सुमारास वर नमुद पाचही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून त्याद्वारे पलायन केले होते. म्हणून नवापूर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 642/2022 भादंवि क 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या दोन तासापूर्वी अटक केलेल्या दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या आरोपीतांनी लॉकअपची खिडकी फोडून पलायन केल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. सदर घटनेबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे व इतर अधिकाऱ्यांना तात्काळ कळविली.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस


अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार

तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपीतांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता ते सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी फरार आरोपीतांचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे 06 वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांचे मुळ गाव असलेले औरंगाबाद, जालना जिल्ह्यात, गुजरात, मध्य प्रदेश राज्यात रवाना केले.


आरोपीतांचा नवापूर तालुक्यात व नवापूर तालुक्याच्या सीमावर्ती भागात सर्वत्र शोध मोहिम राबवून नवापूर तालुक्यातील सर्व परिसत पिंजून काढला. दिनांक 05/12/2022 रोजी सायंकाळच्या सुमारास लॉकअप तोडून पळालेला आरोपी नामे हैदर ऊर्फ इस्त्राईल ईस्माईल पठाण वय- 20 रा. कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद यास गुजरात राज्यातील उच्छल गावाच्या परिसरात स्थानिक पोलीसांच्या मदतीने व दिनांक 08/12/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकीलखाँ ईसमाईलखाँ पठाण वय-22 रा. कठोरा बाजार ता. भोकरदन जि. जालना यास मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील खडकावाणी गावाच्या जंगलातून पकडण्यात यश आले. परंतु फरार असलेले तीन आरोपीतांना पकडण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील हे सतत पथकांच्या संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत होते.


गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे यांचे नेतृत्वाखाली असलेले पथक लॉकअप तोडून पळालेल्या आरोपीतांचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेले मुळ गावी ब्राम्हणी गराडा येथे त्यांचा शोध घेत होते, परंतु आरोपीतांचे गाव जंगलात असल्यामुळे त्यांना तेथे असलेल्या भौगोलीक परिस्थितीची एकाप्रकारे नैसर्गीक मदतच मिळत होती. दोन्ही पथके वेशांतर करुन संशयीत आरोपीतांच्या घराच्या आजूबाजूला रात्रंदिवस पाळत ठेवत होते. फरार झालेले आरोपी हे सराईत व अत्यंत चलाख असल्यामुळे ते सहज कोठे बाहेर येत नाहीत व त्यांच्या गावाच्या लगत असलेल्या जंगलात राहात असतात. त्यामुळे पथकाला आरोपींचा नेमका ठावठिकाणा समजून येत नव्हता. नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने अत्यंत कमी वेळेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड सारख्या तालुक्यात बातमीदारांचे जाळे तयार करुन आरोपी नामे गौसखाँ, युसुफ पठाण, इरफान पठाण यांचे राहण्याचे निश्चित ठिकाण शोधून काढले.दिनांक 28/12/2022 रोजीच्या पहाटे 04.00 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपीतांच्या गावालगत असलेल्या जंगलातील शेतात गौसखाँ, युसुफ पठाण, इरफान पठाण हे लपून बसले असल्याची बातमी मिळाल्याने नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे व त्यांच्या पथकाने ब्राम्हणी गराडा गावाच्या बाहेर असलेल्या जंगलातील शेताच्या आजूबाजूच्या परिसरात सापळा रचला, परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून तीन इसम पळतांना दिसून आल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमाला नाव गाव विचारले असता 1) इरफान इब्राहिम पठाण वय- 352) युसुफ असिफ पठाण वय- 22 3) गौसखों हानिफखॉ पठाण वय 34 क्र. 3 ते 5 रा- ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवून विचारपुस करुन अटक करण्यात आली आहे..


नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून पळालेल्या पाचही आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी अथक परीश्रम घेवून पुन्हा जेरबंद केले. म्हणून दिनांक 28/12/2022 रोजी झालेल्या मासिक गुन्हे बैठकीत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे तसेच नवापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.


सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, नवापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. निलेश वाघ तसेच नवापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने