मालपुर मालपुर येथील बीएसएनएलच्या ऑफिसमध्ये पुन्हा चोरीचा प्रकार समोर आला आहे.येथे तिसर्यांदा भरदिवसा झाली चोरी. चोर माञ लंपास पोलिसाच्या हाता तुरी देवुन अध्याप चोराचा शोध नाही.
सविस्तर वृत्त असे कि मालपुर गावात अमरावती प्रकल्पच्या काॅलनीत मोठ मोठी काटेरी झांडामध्ये B.S.N.Lचे कार्यालय आहे. तेथे भर दुपारी महागड्या अशा उपकरणाची काॅपर असलेल्या जाडकेबल वायरी वमोठे तांबे असलेल्या थ्रीजी.टुजी उपकरण असलेल्या केबल वायर मोठ्या शिताफिने चोरुन नेण्याचे उघडकिस आले आहे. व जवळच काठेरी झुडपातजाळुन तांबे घेउन चोर पसार झाला आहे.
आकाश दादाजी साळवे हे मालपूर गावातील B.S.N.L कंपनीचे टाॅवर बंद का झाले म्हणुन तपासणी करण्यासाठी गेले असता त्यांना तेथे चोरी झाल्याचे आढळुन आले. चोरट्यांनी बीटीएस इक्वेममेंट वाय फाय युनिट व एसी चोरुन नेल्याचे दिरले. तो जवळ पास ३२०००रुपयाएवढ्या किंमतीचाआहे. या प्रकरणी B.S.N.Lचे दोंडाईचा येथील कनिष्ठ अभियंता अंकुश वसावे.यांनी अज्ञात संशयीत चोराविरुध्द गुन्हा दाखल केला.आहे
व घटनास्थळी पंचनामा प्रसंगी पोलिस पंकज ठाकुर,पो.काॅ.अनिल धनगर,पोलिस नाईक व भारत दूर संचार विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री अंकुश वसावा आकाश साळवे आदी उपस्थित होते. आज देशदूत चे मालपुर प्रतिनिधी दोंडाईचा पोलिस ठाणे गेले असता. पंकज ठाकुर हे धुळे येथे आॅफिस कामासाठी गेले होते. व अनिल धनगर यांच्याशी संपर्क साधलाण्याचा प्रयत्नकेला माञ संपर्क होवु शकला नाही. आॅन ड्युटि ठाणे अंमलदाराणे सदर माहिती दिली. पुढील तपास पंकजठाकुर करित आहेत.माञ चोरा च्या बाबतीतशोध लागेल कि नाही .अशी खमंग चर्चा गावकर्यात होत आहे.
