मनमाड उपजिल्हा रुग्णालय तर्फे अपंग बांधवांना अपंगतत्व दाखले मिळावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा, नाशिक -शाताराम दुनबले



नाशिक:- अपंग सरक्षण हक्क कायद्या अन्वये महाराष्ट्र शासन तर्फे 14 सप्टेंबर 2018 रोजी शासन निर्णय आरोग्य विभाने काढले आहे, प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, व उपजिल्हा रुग्णालय येथे स्थानिक अपंग बांधवांना अपंग दाखले देण्याची तरतूद केली आहे,
त्या अनुषंगाने दि 22/10/2018 रोजी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी तर्फे उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे, अपंग बांधवांना अपंग दाखले मिळावे बाबत निवेदन द्वारे मांगणी केली होती, त्या मांगणी नुसार  VBA जिल्हा कमिटी यांना उपजिल्हा रुग्णालय तर्फे लेखी आश्वासन पत्र देखील देण्यात आले होते, परंतु संबंधित अधिकारी तर्फे शासन निर्णयची अमलबजावणी करण्यास अती विलंब करून शासन निर्णयची पायमल्ली करण्यात आली आहे,

  वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष मा,कपील अहिरे साहेबांतर्फे जिल्हा कमिटी मार्फत अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्यास सदर प्रकरणी सतत  पाठव पुरावा केला आहे,

तरी देखील शासन निर्णय नुसार उपजिल्हा रुग्णालय मनमाड तर्फे अपंग बांधवांना दाखले देण्याची तात्काळ कारवाई करण्यात होत नसेल तर,  या गेंड्याच्या कातडीचे बेजबाबदार अधिकारी,विरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हे गरजेचे झाले आहे,

तरी आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी तर्फे उपजिल्हा रुग्णालय वैद्दकीय अधीक्षक यांना निवेदन द्वारे मांगणी केली आहे,व शासन निर्णय नुसार मनमाड शहर व ग्रामीण भागातील अपंग बांधवांना मनमाड उपजिल्हा रुग्णालय तर्फे अपंग दाखले, मिळवण्याची/ देण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अन्यथा वचित बहुजन आघाडी   तर्फे उपजिल्हा रुग्णालया मनमाड कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदन द्वारे वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटी तर्फे  देण्यात आला आहे, या वेळी, जिल्हा सचिव, कादिर शेख, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे,शहर उपाध्यक्ष गणेश एळीजे, शकील शेख, गोरख पगारे, अकील सैय्यद, आदी इतर कार्यकर्ते उपस्थित होते,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने