एकलव्यपाडा येथे शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न----



शिरपूर तालुक्याचे भाग्यविधाते थोर स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांनी तालुक्यात शिक्षणाची गंगा आणुन जिल्ह्यातील अनेक तरुणांना शिक्षण,रोजगार,नोकरीच्या संधी निर्माण करुन दिल्या.यामुळे संपूर्ण भारतात आपले विद्यार्थी आज डॉक्टर,इंजिनिअर,वकिल, शिक्षक,शाश्रज्ञ,कवी,लेखक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.या बरोबर तालुक्याच्या विकासासाठी रंधे परिवाराचे मोठे योगदान आहे.कर्मवीरांचा वारसा आजची पिढी सामाजिक बांधिलकी जपून चालवित आहे.सामाजिक,आर्थिक,शैक्षणिकदृष्टय़ा आपण समाजाचे देणं लागतो म्हणून अतिबहुल आदिवासी भागात आरोग्य,शिक्षण,संबंधित आवश्यक मदत करत असतात.मोफत आरोग्य शिबीरे ,कपडे,दफ्तर,शैक्षणिक साहित्य वाटप सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.आज वीर बिरसा मुंडा जयंती व धुळे-नंदुरबार ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर प्रतिष्ठान शिरपूर व राहुल रंधे फाऊंडेशनच्या माध्यमातून बोराडी जवळील एकलव्यपाडा येथील जि.प.शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,दफ्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी तात्यासो.शशांक रंधे,गावातील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जन पावरा,सदस्य इंद्रान पावरा,दरबार पावरा,सुका पावरा(पोलीस पाटील )तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संत गाडगे नगर येथील मुख्याध्यापक यशवंत रामराव पाटील,टेंभेपाडा येथील मुख्याध्यापक यशवंत निकम,छोटु राजपूत,रविंद्र खोंडे,संजय पवार,कर्मवीर प्रतिष्ठान चे सचिव संदीप.शेखर माळी,गणेश सोनवणे,अनिल बडगुजर,गजु पाटील,ज्ञानेश्वर डोळे,संदीप पवार पाटील,शाळेचे मुख्याध्यापक दिनेश श्रीराव,हरीश कंठाले,राम सर,अभय पाटील,राहुल महाले,गणेश भामरे,प्रकाश वाल्हे,मुकेश जाधव व गावातील नागरिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने