शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील डेथ पूल म्हणून ओळखले जाणारे गिधाडे व सावळे येथील तापी पूलांवर नेहमीच आत्महत्येच्या घटना समोर येत असतात. याबाबत वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास येऊन देखील या ठिकाणी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आजपर्यंत प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.
काल दिनांक 21 रोजी शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदी पुलावर मोटरसायकलने आलेल्या युवकांनी मोटरसायकल पुलावर लावून नदीपात्रात उडी घेतली असे काही प्रत्यक्ष दर्शनी पाहिले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. त्यास बचावासाठी प्रयत्न केले गेले मात्र दुर्दैवाने यात तरुणाच्या बुडून मृत्यू झाला. यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार सदरच्या 24 वर्षे तरुण हा सुरेंद्र सरदार सिंग राजपूत असून तो तालुक्यातील टेंबे बुद्रुक येथील रहिवासी आहे. हा तरुण कृषी क्षेत्रात मार्केटिंगचे काम करत होता मात्र काल अचानक त्याने अशा प्रकारच्या दुर्दैवी निर्णय घेतल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्यात मृतदेहाच्या शोध घेणे सुरू होते आज दिनांक 22 रोजी सकाळी शोध सुरू असताना या युवकाच्या मृतदेह आढळून आला आहे. सदरची दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश केला. या तरुणांनी हा निर्णय का घेतला याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून याबाबत तपास सुरू आहे. सदर युवकाच्या मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला व यानंतर तो नातेवाईकांना सुपूर्त करून या युवकाची अंतिम यात्रा आज रोजी टेंभे गावी होणार आहे अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

