शिरपूर : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत कृ षीरत्न फार्मस् प्रोड्युसर कंपनी लि. मार्फत दि. २६ रोजी शिरपूर तालुक्यातील गरताड, आढे, दहिवद, शिरपूर या परिसरातील सभासदांना रब्बी हंगामात मका या पिकाचे बी-बियाणे व किटक नाशक मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कृषीरत्न कं पनीचे मॅनेजींग डायरेक्टर धनराज के. राजपूत, सेक्रेटरी प्रियंका महेंद्रसिंग राजपूत, चेअरमन मुकेश राजू पावरा, डायरेक्टर पवन नंदु ठाकूर, लखन थोरात, प्रमोटर दिनेश गुलाब भोई, पंकज बारी यांच्या उपस्थितीत मका पिकाचे बी-बियाणे व किटक नाशक मोफत वाटप करण्यात आले. सर्व शेतकरी सभासदांनी कंपनीचे मनापासून आभार व्यक्त केले. मयुर येशी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Tags
news
