शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यात सध्या न्यायालयाच्या आदेशान्वये गायरान जमिनीवरील अतिक्रमित लाभार्थ्यांना नोटीस प्राप्त झाल्याने खळबळ माजली असून शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढावा व लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.
याबाबत आज तालुक्यातील शिंगावे गावातील लाभार्थ्यांनी व शिंगावे गणातील पंचायत समिती सदस्य चंद्रकांत दामोदर पाटील यांनी उपविभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांना निवेदन देऊन मागणी सादर केले आहे.
प्रामुख्याने त्यांनी शिंगावे शिवारातील गायरान जमिनीवरील सन 2011 पूर्वीचे असलेले घरकुल हे नियमाकूल करावे अशी मागणी केली आहे.
मोजे शिंगावे ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व १३ क्षेत्र १७ हेक्टर 22 आर या जमिनीवरील शिंगावे ग्रामपंचायत तर्फे ठराव करून घरकुल मंजूर केले आहेत त्या दिवसापासून या जमिनीवर लाभार्थी घरकुलांच्या लाभ घेत आहेत त्यांचे घरकुल हे सन 2011 पूर्वीपासूनच असून ते सर्व लाभार्थी ही भूमीहिन, शेतमजूर, मागासवर्गीय व बेरोजगार कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे या जागेसाठी ग्रामपंचायतीने 8अ चे उतारे देखील लाभार्थ्यांना दिले असून त्यानुसार लाभार्थ्यांनी कर देखील भरला आहे.
मात्र आता शासनाकडून आलेल्या नोटिसी नंतर या सर्व लाभार्थ्यांची गैरसोय होणार असून या निर्णयामुळे हजारो कुटुंबे ही रस्त्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे शासनाने या निर्णयाच्या गांभीर्याने विचार करून यावर तोडगा काढावा व सदरची घरकुले नियमाकूल करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील तसेच लाभार्थी थोरात गोविंदा भीमराव पाटोळे दिनेश विजय आर एस पाटील इत्यादी लाभार्थ्यांनी देखील निवेदन नावावर तयार केल्या आहेत.

