खर्दे बु. येथे एस. व्ही. के. एम. नर्सिंग कॉलेजचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न




शिरपूर : तालुक्यातील खर्दे बु. येथे एस. व्ही. के. एम. नर्सिंग कॉलेजचा भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न झाला.


श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ अध्यक्ष तथा एन. एम. आय. एम. एस. अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विविध मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता खर्दे बु. ता. शिरपूर येथे एस. व्ही. के. एम. नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते धार्मिक पूजाविधी करुन तसेच श्री विले पार्ले केळवाणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.



यावेळी आमदार काशिराम पावरा, श्री विले पार्ले केळवाणी मंडळ सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ ट्रस्ट राजगोपाल भंडारी, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदिया, माजी उपनगराध्यक्ष सुरेश बागुल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, तालुकाध्यक्ष किशोर माळी, खर्दे बु. माजी सरपंच रवींद्र गुजर, भरत गुजर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, शिरपूर शहर व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी एस. व्ही. के. एम. ट्रस्टी राजगोपाल भंडारी म्हणाले, माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून शिरपूर तालुक्यात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शैक्षणिक दालने सुरू करण्यात आले आहेत. तालुक्यात हजारो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत. एस. व्ही. के. एम. मार्फत भव्य व अत्याधुनिक हॉस्पिटलचे काम वेगाने सुरू असून विविध वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहेत. आज नर्सिंग कॉलेजचे भूमिपूजन झाले असून लवकरच इमारतीचे काम पूर्ण होऊन तालुक्यासह अनेक भागातील विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा लाभ घेता येणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने