पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ९वा वार्षिक क्रीडा समारोह उत्साहात संपन्न



नंदुरबार- (वि.प्र)- जिल्ह्यातील आधुनिक शिक्षणात अग्रेसर असलेली पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच ९वा वार्षिक क्रीडा समारोह मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या भूषविले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मोना मित्तल लाभले होते..

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्याचे स्वागत शाळेचे प्राचार्य श्री मुकुंद इंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत सोहळा शाळेच्या मैदानावर पार पडला. क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सौ. मोना मित्तल व विद्यालयाचे प्राचार्य श्री. श्री. मुकुंद इंगळे यांनी मशाल पेटवून केले. यावेळी शालेय गीत विशिष्ट शैलीत सादर करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मास पीटीच्या कवायती सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. विद्यालयातील विद्यार्थीनींनी नृत्यावर थिरकत आपल्यातील सुप्त कला गुणांचे सादरीकरण केले. यामध्ये वर्ग पाच ते दहा च्या विविध विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. संपूर्ण खेळ खेळून झाल्यांनतर शाळेच्या क्रीडांगनावर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्ती प्रमाणपत्र व सुवर्ण कास्य व रौप्य असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुणे याच्याद्वारे वितरित करण्यात आले प्रमुख पाहुणे सौ मोना मित्तल यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी पालकांसाठी देखील विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रामुख्याने महिला पालकांसाठी रस्सीखेच तर पुरुष वर्गांसाठी लिंबू- चमचा हे सकृतदर्शनी मोठया उत्साहात पार पाडले. प्रत्येकी खेळ प्रकारातून पालक विजेत्यांना प्रमाणपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. मुकुंद इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत विजेता संघ घोषित केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा विद्यार्थी दिग्नाग पगारे आणि शिवानी कडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल पगारे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी शाळेचे प्रशासकीय अधिकारी श्री. शरद जाधव, क्रीडा शिक्षक कैलास भांडारकर, शाळा समन्वयक किरण पाटील, नागेश सूर्यवंशी, गोपाळ बडगुजर व शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने