अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज यांच्यातर्फे आओ गढे संस्कारवान पिढी अभियान





शिरपूर - अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज यांच्यातर्फे   *आओ गढे संस्कारवान पिढी* या अभियानांतर्गत गर्भोत्सव संस्कार या विषयावर शिरपूर तालुक्यातील सर्व आशा वर्कर्स यांना प्रशिक्षण देण्यासाठी गायत्री शक्तीपीठ शिरपूर यांच्यातर्फे पंचायत समिती कार्यालयातील आमदार अमरीश भाई पटेल हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती आदरणीय सौ लताबाई पावरा, उपसभापती आदरणीय दादासो विजयजी बागुल, या कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शिका आदरणीय डॉक्टर सौ मधुबाला अग्रवाल ,अकोला ,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदरणीय डॉक्टर ध्रुवकुमारजी वाघ, गटविकास अधिकारी श्री संजय सोनवणे, शिरपूर वरवाडे नगर परिषद चे मुख्याधिकारी आदरणीय श्री तुषार जी नेरकर प्रभारी तालुका वैद्यकीय श्री डॉ राष्ट्रपाल अहिरे गायत्री परिवाराचे  उप झोन प्रमुख आदरणीय देवचंद्र कावळे गायत्री शक्तीपीठ शिरपूरचे अध्यक्ष अनिल जी अग्रवाल, गायत्री शक्तीपीठ शिरपूरचे आधारस्तंभ आदरणीय कमल किशोरजी भंडारी या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न व परिश्रम घेतलेले व प्रशिक्षणाचे आयोजन करणारे आदरणीय डॉक्टर योगेश जाधव डॉक्टर सुहास चव्हाण भावसार ताई शिंदे भाऊसाहेब, डॉ नितु बत्रा, डॉ नलिनी राठी मॅडम हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय श्री डॉक्टर योगेशजी जाधव यांनी केले
सदर कार्यक्रमात गर्भ  संस्कार या विषयावर आदरणीय डॉक्टर सौ मधुबाला अग्रवाल , योग प्राणायाम व ध्यान या विषयावर योगशिक्षक एस डी माळी रावसाहेब ,दिनश्चर्या या विषयावर आदरणीय श्रीमती संधानसिवे मॅडम ,आहार या विषयावर आदरणीय श्रीमती शिंदे ताई यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात सौ नीलिमा दीदी यांनी भावगीत सादर केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदरणीय रेखा दीदी व श्री बी आर महाजन सर यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या तांत्रिक बाजू कुणाल भावसार यांनी सांभाळली कार्यक्रमाचे आभार अरुण भाऊ पटेल यांनी मानले तसेच कार्यक्रमाची इतर व्यवस्था रजिस्ट्रेशन इ. जावंत्रे सर चंदू भाऊ यांनी पाहिली सदर कार्यक्रमात सर्व गटप्रवर्तक व आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला 
सदर कार्यक्रमास तालुक्यातून जवळपास 400 गटप्रवर्तक व आशा वर्कर्स उपस्थित होते


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने