सांगवी बीटच्या पर्यवेक्षिकेची पेसातून बदलीची बिरसा फायटर्सची मागणी; दिला आंदोलनाचा इशारा



प्रतिनिधी, शिरपूर
             तालुक्यातील सांगवी भाग 2 च्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पी. आर पाटील यांची पेसा क्षेत्रातून तात्काळ बदलीची मागणी बिरसा फायटर्स संघटनेेने निवेदनाद्वारे सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास, सभापति महिला व बालविकास यांच्याकडे केली. बदली केली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. 
          संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलेय की, महामहिम राज्यपाल यांच्या अधिसुचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील 12 संवर्गातील पदे ही स्थानिक अनुसूचित जमातिच्या उमेदवारांमधून क्रमप्राप्त आहे. तसा 5 मार्च 2015 रोजीचा शासन निर्णयही आहे. मात्र असे असतांना सांगवी भाग 2 च्या अंगणवाडी पर्यवेक्षिता पी. आर. पाटील हे मागील कित्येक वर्षांपासून पेसा क्षेत्रात ठाण मांडून बसल्या आहेत. तसेच मनमानी कारभार करतात, उद्धटपणे बोलणे आदी अनुचित प्रकार घडतात.पर्यवेक्षिका पी. आर. पाटील यांची पेसा क्षेत्रातून तात्काळ बदली करण्यात यावी. अन्यथा येत्या 15 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सभापति महिला व बालविकास यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, तालुका सचिव गेंद्या पावरा, धुळे जिल्हा महासचिव साहेबराव पावरा, जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा यांच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने