धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,धुळे यांनी सन 2020-21 या वर्षात प्रधानमंत्री महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत धुळे जिल्ह्यात उत्कृष्ट काम केले म्हणून सर्वोत्कृष्ट जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष डॉ.तुषारजी रंधे,विद्यमान अध्यक्षा सौ.आश्विनीताई पवार माजी सीईओ सी.वान्मथी,सीईओ एस.भुवनेश्वरी,सहाय्यक जिल्हाधिकारी मा तृप्ती धोडमिसे,मा.प्रकल्प संचालक संगमनेरे मॅडम यांनी स्वीकारला.यावेळी विधानसभा अध्यक्ष ना,राहुल नार्वेकर,ग्राम विकास व पंचायत राज मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मिना,राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ.राजाराम दिघे इ.उपस्थित होते.
सन 2020-2021 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत धुळे जिल्ह्याने घरकुलांचे काम गतीने पुर्ण करुन उत्कृष्ट काम केले आहे.म्हणून पुरस्कार देण्यात आला.धुळे जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ .तुषारजी रंधे यांच्या मार्गदर्शनातुन योजना राबविण्यात आली याबद्दल जिल्हाभरात अभिनंदन करण्यात येत आहे.डॉ.रंधे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील मा प्रकल्प संचालक सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याबद्दल अभिनंदन व कौतुक केले व याबाबत पुढील पुरस्कार मिळावा यासाठी शुभेच्छा दिल्या.
