जिहादी नराधमला भर चौकात फाशीची शिक्षा द्या -हिंदुत्ववादी संघटनांची मागणी




शिरपूर - दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचा निषेध करीत जिहादी नराधमला भर चौकात फाशीची शिक्षा देत त्याच्या परिवारावर कठोर कार्यवाही करावी तसेच लव्ह जिहाद विषयी कठोर कायदा  करण्यात यावा अशी मागणी बुधवारी शिरपूर शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रेमाचे खोटे नाटक करीत जिहादी षढयंत्रेच्या लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या श्रद्धा वालकर हिचा मुस्लिम युवक आफताब पुनावाला याने केलेल्या निर्घृण हत्येचा शिरपूर येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करीत आफताब पुनावाला याला भर चौकात फाशीची शिक्षा देत परिवारावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच हिंदू मुलींना अश्या पध्दतीने लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढणे हे हया जिहाद्यांचे नियोजित षडयंत्र व महिलांच्या विरोधात अमानवी कृत्य सरकारने लक्षात घेऊन लव्ह जिहाद विरुद्ध कथित कायदा करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.याप्रसंगी तालुक्यातील हिंदू जागरण मंच,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल,राष्ट्र सेविका समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने