स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांच्या कारवाईत शहादा तालुक्यात अवैध मध्ये साठा ची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनासह आठ लाखांच्या मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे




शहादा तालुक्यातील शहादा -असलोद रस्त्यावरील सावखेडा गावाजवळ अवैध दारू वाहतूक करणारी वाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण नंदुरबार यांनी जप्त केले. अवैध मद्यसाठा सह वाहन असा सुमारे आठ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


        मिळालेल्या माहितीनुसार, असलोद- शहादा रस्त्यावर अवैध रित्या दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांना मिळाली पोलिसांनी तत्काळ सापळा रचून सावखेडा गावानजीक अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पांढऱ्या रंगाची टाटा एस मालवाहू क्रमांक एम. एच.१२ए.डि.५०१९ वाहन थांबवुन तपासणी केली असता हीच्यात अवैधरित्या विनापास परमिट शिवाय विदेशी दारू कब्जात बाळगुन तीची चोरटी वाहतुक करतांना मिळून आला त्यात रॉयल ब्लु व्हिस्की नावाच्या दारूच्या बाटल्या त्याची किंमत सुमारे पाच लाख ९४ हजार किमतीचा तसेच दोन लाख किमतीची मालवाहू वाहन असा सात लाख ९४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक करणारा मनिष शिवाजी नगराळे, वय-24 वर्ष रा. दोंडाईचा, ता शिंदखेडा जि धुळे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने