मोलगीच्या कै.बी.एस. सैंदाणे कनिष्ठ विद्यालयात महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथी साजरा


                    अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील कै.बी.एस. सैंदाणे कनिष्ठ विद्यालय व बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयूक्त विद्यमाने महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला.
                   सुरवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.धनसिंग वसावे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.धनसिंग वसावे, प्रमुख पाहुणे  बार्टीचे समन्वयक ब्रिजलाल पाडवी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. त्यानंतर कार्यक्रमाचे बार्टी समन्वयक ब्रिजलाल पाडवी महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य व समतेचे विचार याविषयी प्रबोधन केले. बार्टीच्या संविधान सप्ताह निमित्त संविधान आधारित विद्यार्थ्यांचा प्रश्न मंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. समाजकल्याण मंडणगड पँटर्न,समान संधी केंद्र स्थापना करण्याविषयी माहिती दिली प्रा. रविंद्र वानखेडे अंधश्रद्धा व श्रद्धा यावर मार्गदर्शन केले प्रा. प्रेमसिंग पाडवी स्पर्धा परिक्षा व शैक्षणिक महत्व याविषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थी ईला राऊत महात्मा फुले जीवय परिचय व सामाजिक कार्य याविषयावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.धनसिंग वसावे शेतक-यांचे आसुड सत्यसमाज सुधारक स्थापनेविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास समाधान महाजन,प्रविण चौरे,सुभाष पाडवी,रविंद्र भोई,रविंद्र वळवी व विद्यार्थीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विनोद कुवर तर आभार मनोज चौरे यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने