नाशिक - मोटर मालक कामगार वाहतूक संघटने तर्फे साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्रॅक्टर ट्रॉली यावर कारवाई करण्याबाबत.तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये माल वाहतुकीबाबत.नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
साखर कारखान्यावर मोठया प्रमाणात ऊस वाहतुकीसाठी पारंपरिक ट्रक ऐवजी ट्रॅक्टर डबल ट्रॉलीचा उपयोग हल्ली मोठया प्रमाणावर होत आहे. सदर ट्रॅक्टर वर चालक म्हणुन असणारे ड्रायव्हर हे प्रशिक्षित तसेच अनुभवी नसतात. ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसतात. आपल्या भागातील बरेच रस्ते सिंगल आहेत. तसेच त्यांना मोठया प्रमाणावर साईड पट्टीवर कपारी आहेत. हे ट्रॅक्टर ड्रायव्हर टेपचा मोठया आवाज करुन वाहन चालवतात तसेच प्रशिक्षित नसल्या कारणाने मागील व पुढील वाहनांवर यांचे लक्ष राहत नाही, त्यांच्या या आडमुठेपणामुळे बऱ्याच निरपराध, मोटसायकल, कार चालक, ट्रक चालक व सामान्य नागरिकांना त्रास होतो. छोटे मोठें अपघात होतात या अपघातामुळे निष्पाप लोकांचा अपघातात बळी जातो. ट्रॅक्टर हे शेतकरी अवजार आहे ट्रॅक्टर ने व्यवसाय करने चुकीचे आहे साखर कारखानदार हे चुकीचे वाहतूक करार ट्रॅक्टर डबल ट्रॉली बरोबर करत आहे.
हा सर्व प्रकार खुप गंभीर असुन सर्व सामान्य लोकांचा जीव धोक्यात घालून या ट्रॅक्टर डबल ट्रॉली ने क्षमतेपेक्षा जास्त माल घेऊन जाण्याचा धडाका लावला आहे व या वाहतुकीचे साखर कारखाने पण समर्थन करतांना दिसतात.
त्यामुळे अश्या डबल ट्रॅक्टर ट्रॉली वर परिवहन विभागाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.साखर कारखाने यांना परिवहन विभागाकडून ट्रॅक्टर डबल ट्रॉली ने उस वाहतूक ( व्यवसाय) करने चुकीचे तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका असल्या कारणाने ट्रॅक्टर डबल ट्रॉलीचे करार रद्द करावे असे आदेश काढण्यात यावे ही विनंती संघटने तर्फे करण्यात आली.
प्रवासी वाहतूक करणारे वाहनांमध्ये माल वाहतूक मोठया प्रमाणात होत आहे त्यामुळे या वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन घेऊन प्रवासी वाहने माल,प्रवासी घेऊन जातात. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येतो त्याचे उदाहरण म्हणजे काही दिवसापूर्वी नाशिक येथे झालेले प्रवासी वाहनांचा भीषण अपघातात निष्पाप लोकांचा होरपळून झालेला मृत्यू त्यामुळे प्रवासी वाहनांमध्ये माल वाहतूक परिवहन विभागाकडून कारवाई मार्फत थांबवावी ही विनंती संघटने तर्फे करण्यात आली
त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन जाधव, संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य विनायक वाघ, किरण भालेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विश्वास तांबे, दिलीप सिंग बेनिवाल, कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक संघटना अध्यक्ष अयुब कच्छी, संगमनेर संघटना अध्यक्ष शरीफ भाई , श्रमिक सेना पवन क्षीरसागर, अवतार सिंग बिर्दी, दीपक मंडलिक ,भास्कर चोधरी, सचिन खैरनार, छत्रपती सेना प्रदेश अध्यक्ष राजेश पवार, संतोष भागवत , लख्खा सेठ ज्ञानेश्र्वर वरपे, चैरमन नरेश बंसल, विनोद शर्मा, जालीम सिंग,अनिल कौशिक, श्रीरामपूर दत्ता शिंदे, उल्हास शेठ,हिरामण महाजन, किरण वैद्य, वसीम भैया, बिपिन प्रवीण शर्मा,ए एन तिवारी,राजू पवारआदी पदाधिकारी उपस्थित होते.
