नंदुरबार - ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार रणवीर सिंह राजपूत यांचे पुतणे स्व.सुवर्णसिंह गुलजारसिंह राजपूत रा.नंदुरबार यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे.
सुवर्णसिंहहामितभाषी,चारित्र्यवान,धाडसी,
कर्तव्यदक्ष,संकट समयी मदतीला धावणारा,बुद्धिमान असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.स्वतः कॅन्सरग्रस्त असूनही त्याला न डगमगता त्याने तब्बल आठ वर्षे समर्थपणे लढा दिला.परंतु लढता लढता अखेर त्याचे देहावसान झाले.कारण मानवाला विधीलिखित टाळता येत नाही.एखाद्या लढवैय्या सारखा तो अखेरपर्यंत लढला.स्वाभिमानानं कसं जगावं,याचं सुवर्णसिंह हा प्रतिक होता.*मोडेल पण वाकणार नाही*,हा *क्षत्रिय बाणा* त्याने जीवनाच्या शेवटपर्यंत जपला.जीवनात त्याने माणुसकीला अधिक महत्त्व दिलं. एल आय सी क्षेत्रात तो एक उत्तम मार्गदर्शक होता.त्याने जीवनात विमाचे किती महत्त्व असतं,हे लोकांच्या मनात बिंबविले.असा हरहुन्नरी
सुवर्णसिंह आम्हा सर्व चाहत्यांना सोडून गेला.याचे अतीव दुःख झाले.त्याच्या एकाएक गेल्याने,आमच्या परिवाराची न भरून निघणारी क्षती झाली.
त्यांचा उत्तरकार्याचा कार्यक्रम १४ नोव्हेंबर रोजी सकाळी नंदुरबार येथील कोरीट नाका जवळील निवासस्थानी होईल. याची सर्व नातेवाईकांनी नोंद घ्यावी.
त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी👏 प्रार्थना! व भावपूर्ण श्रद्धांजली!